बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“संजय राऊत कालही महत्वाचे नव्हते आजही नाहीत, आता…”

मुंबई | राज्याच्या सत्तानाट्यात आता भाजपने उडी घेतली आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी राज्यपालांना पत्र देऊन महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करण्यास बहुमत चाचणी घ्यायला सांगितली आहे. त्यानुसार राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी 30 जूनला विशेष अधिवेशन बोलावलं असून शिवसेनेची चिंता वाढली आहे.

एकीकडे शिवसेनेच्या सभा आणि मेळाव्यात तसेच पत्रकार परिषदांमध्ये खासदार संजय राऊत हे शिंदे गटाच्या आमदारांचा हालाखीचा इतिहास सांगून त्यांच्यावर जोरदार हल्ला करत आहेत. तर दुसरीकडे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे त्यांच्या आमदारांना भावनिक आवाहन करत आहेत. अशामुळे शिवसेनेची नेमकी भूमिका काय?, असा प्रश्न पडला आहे. यावर आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी आपलं मत दिलं आहे. पाटील म्हणाले, संजय राऊत हा कालही महत्वाचा मुद्दा नव्हता आणि आजही महत्वाचा मुद्दा नाही. त्यांचे काय करायचे याचा निर्णय मुख्यमंजत्री उद्धव ठाकरे यांनी घ्यावा, असा टोला त्यांनी लगावला.

पुढे बोलतानी पाटील म्हणाले, 2019 च्या विधानसभा निवडणुकीत जनतेने आघाडीला स्पष्ट बहुमत दिले होते. फडणवीस हेच मुख्यमंत्री होणे अपेक्षीत होते. पण, उद्धव ठाकरे यांनी जनमताचा अनादर करत काँग्रेस, राष्ट्रवादीसोबत अनैतिक आघाडी केली. त्याची मोठी किंमत त्यांना आज मोजावी लागत आहे. ही अनैतिक आघाडी न पटल्याने काही स्वाभिमानी लोकांचा गट बंड करुन उठला आहे. त्यांचा सुद्धा हीच ईच्छा आहे की, फडणवीस मुख्यमंत्री व्हावे.

भाजपच्या उडीमुळे राजकीय वारे आता जोराने वाहु लागले आहेत. शिंदे गट आणि महाविकास आघाडी सरकार आता काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

थोडक्यात बातम्या –

भाजपबाबत पृथ्वीराज चव्हाण यांचा मोठा दावा, म्हणाले…

ठाकरे सरकारचं काऊंटडाऊन सुरू, 30 तारखेला सरकारची बहुमत चाचणी

मोठी बातमी! देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला, महाराष्ट्रात सत्तापालट होणार?

‘डुकरं, नाल्याची घाण, रेडा, कुत्रे, याचा काय अर्थ?’; एकनाथ शिंदेंचा घणाघात

मुकेश अंबानींकडून जिओच्या संचालक पदाचा राजीनामा, आकाश अंबानींना दिली महत्त्वाची जबाबदारी

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More