बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय हे सरकारचं अपयश, उद्धव ठाकरेंनी राजीनामा द्यावा”

अहमदनगर | सर्वोच्च न्यायालयानं मराठा आरक्षण रद्द ठरवलं आहे. यावरून भाजपचे जेष्‍ठ नेते आणि आमदार राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी ठाकरे सरकारवर सडकून टीका केली आहे. मराठा आरक्षण रद्द करण्याचा सर्वोच्‍च न्‍यायालयाचा निर्णय हे राज्‍यातील महाविकास अघाडी सरकारचं अपयश आहे. या अपयशाची जबाबदारी स्विकारून मुख्‍यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली.

मराठा आरक्षणाच्‍या प्रश्‍नासंदर्भात जनतेनेच रस्‍त्‍यावर उतरून महाविकास आघाडीच्‍या मंत्र्यांना जाब विचारला पाहिजे, असं राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी म्हटलंय. ते अहमदनगरमध्ये माध्यमांशी बोलत होते.

आरक्षणाच्‍या संदर्भात सरकारमध्‍ये कोणताही समन्‍वय नव्‍हत केवळ केंद्र सरकारकडे बोट दाखवून महाविकास आघाडी सरकार आपली वेळ मारून नेत होते. या आरक्षणाच्‍या विषयातही सरकारचा हलगर्जीपणा समोर आला, असं विखे पाटील म्हणाले.

आरक्षणाच्या संदर्भात महाविकास आघाडी सरकारचे नेते सभागृहात भीमगर्जना करीत मोठ्या आविर्भावात बोलत होते पण सरकार मधील समन्वयाचा अभावच आरक्षण रद्द होण्यास कारणीभूत ठरला आहे, अशी टीका राधाकृष्‍ण विखे पाटील यांनी केली. तसेच महाविकास आघाडी सरकार सर्वच गोष्टींसाठी केंद्रावर अवलंबून राहणार असेल तर राज्य सरकार म्हणून तुम्ही कोणती जबाबदारी पार पाडणार, असा सवाल विखे पाटील यांनी उपस्थित केला.

थोडक्यात बातम्या- 

माझ्यासाठी आणि समाजासाठी अतिशय दुर्दैवी आणि अतिशय भयानक क्षण- विनोद पाटील

“सर्वोच्च न्यायालयाने मराठा बांधवांना जे नाकारलं, त्याची भरपाई राज्य सरकार करुन देणार”

…म्हणून सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षणाचा कायदा रद्द केला- अशोक चव्हाण

मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच ममता बँनर्जी व राज्यपाल जगदीप धनखड यांच्यात वाक् युद्ध

मराठा आरक्षणप्रकरणी देवेंद्र फडणवीसांनी ठाकरे सरकारला दिला हा महत्त्वाचा सल्ला!

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More