Top News

4 वर्ष विरोधी पक्षनेते राहिलेले राधाकृष्ण विखे आता राज्याचे 4 महिने कॅबीनेट मंत्री!

मुंबई | चार वर्ष राज्याचे विरोधी पक्षनेते राहिलेले ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे आता 4 महिने राज्याचे कॅबीनेट मंत्री राहणार आहेत. आज फडणवीस सरकारचा मंत्रिमंडळ विस्तार होत आहे. त्यामध्ये त्यांनी कॅबीनेट मंत्रीपदाची शपथ घेतली आहे.

2014 साली भाजपची सत्ता आल्यावर काँग्रेसने ज्येष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील यांना विरोधी पक्षनेते पदाची संधी दिली. 4 वर्ष त्यांनी विरोधी पक्ष नेतेपद सांभाळलं पण काही कारणांनी त्यांनी काँग्रेसचा हात झिडकारला आणि भाजपच्या गोटात दाखल झाले. आणि आज कॅबीनेट मंत्रिपदाची शपथ घेतली.

ऐन लोकसभा निवडणुकीत त्यांनी काँग्रेसला धक्का दिला आणि आपल्या मुलाला तिकीट न दिल्याने उघड भाजपचा प्रचार केला.

राज्याचे विरोधी पक्षनेते असताना देखील विखेंचं आणि मुख्यमंत्र्यांचं चांगलं जमायचं. त्यांच्या मैत्रीची देखील अनेकदा चर्चा व्हायची.

महत्वाच्या बातम्या

-फडणवीस मंत्रिमंडळात आयारामांना संधी; विद्यमान मंत्र्यांना डच्चू

-भारत आणि पाकिस्तान आमने सामने; मॅँचेस्टरच्या मैदानावर होणार महामुकाबला

-उद्धव ठाकरे 18 खासदारांसह अयोध्येला रवाना

-सरकारचा ‘हा’ डाव मी यशस्वी होवू देणार नाही- सुनील तटकरे

-“नरेंद्र मोदी आणि अमित शहा हेच आमच्यासाठी सुप्रिम कोर्टाच्या ठिकाणी आहेत”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या