Top News अहमदनगर महाराष्ट्र

“राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये जाऊन काँग्रेसने लाचारी पत्करली”

अहमदनगर | काँग्रेस अध्यक्ष सोनिया गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पाठवलेल्या पत्रावरून राजकीय वर्तुळात चर्चा असून विरोधकांनी सरकारवर निशाणा साधला आहे. अशातच भाजप नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी राज्यातील काँग्रेस नेत्यांवर निशाण साधला.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये जाऊन काँग्रेसने लाचारी पत्करली.  किमान समान कार्यक्रम असल्याचं दाखवत काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी राष्ट्रीय नेतृत्वाची दिशाभूल केली असल्याचं राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.

राज्यातील महाविकास आघाडी सरकारचा फक्त सत्ता वाटपाचा कार्यक्रम होता. यामध्ये कुठेही किमान समान कार्यक्रम नव्हता. काँग्रेस पक्षाच्या केंद्रीय नेतृत्वाने दिलेल्या पत्रावरून उघड झालं असल्याचं राधाकृष्ण विखे पाटीलयांनी म्हटलं आहे.

दरम्यान, महाविकास आघाडी सरकारच्याे किमान समान कार्यक्रमानुसार ग्रामीण भागातील दलित, वंचित, मागासवर्गीयांचे जीवनमान उंचावण्याचा कोणताही कार्यक्रम दिसला नाही. एक वर्षाच्याा कार्यकाळात या सरकारने फक्त खोट्या घोषणा केल्या असल्याचा आरोप पाटलांनी केला.

थोडक्यात बातम्या-

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज जनतेशी साधणार संवाद

‘भाजपमधील 70 टक्के आमदार हे राष्ट्रवादीचेच’; राष्ट्रवादीच्या बड्या नेत्याचा गौप्यस्फोट

मुंबई काँग्रेस अध्यक्षपदी अखेर भाई जगताप यांची नियुक्ती

“कंगणाला दिवसातून एकदा माझं नाव घेतल्याशिवाय जेवण पचत नाही”

सीरम इन्स्टिट्यूटच्या अदर पुनावालांनी पंतप्रधान मोदींकडे केली ‘ही’ मोठी मागणी!

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या