हे राज्य सरकार दळभद्री आहे; विखे-पाटलांचा घणाघात

जालना | राज्य सरकार दळभद्री आहे, असा घणाघात विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला आहे. जालना येथील जनसंघर्ष यात्रेच्या जाहीरसभेत बोलताना विखे-पाटलांनी ही टीका केली आहे.

सरकार नावाची व्यवस्था राज्यात आहे की नाही असा प्रश्न पडतो. या सरकारने जनतेचा विश्वास गमावलेला आहे. सरकार जनतेसंबंधी राजधर्म पाळत नाही’, अशी टीका त्यांनी केली आहे.

अपघाताने यांना सत्ता मिळाली आहे. देव देतो आणि कर्म नेतं अशी सरकारची परिस्थिती झाल्याचं त्यांनी सांगितलं. 

दरम्यान, या सरकारने जाहिरात करण्यासाठी एकही जागा सोडली नाही. फक्त सुलभ शौचालय सोडलं आहे. काही दिवसांनी तेथेही जाहिरात द्यायला कमी करणार नाही, असंही त्यांनी म्हटलं.

महत्त्वाच्या बातम्या-

-राज्यात 15 डिसेंबरपर्यंत एकही खड्डा सापडणार नाही- चंद्रकांत पाटील

-छत्तीसगडमध्ये नक्षलवाद्यांचा हल्ला; दुरदर्शनच्या कॅमेरामनसह तीन जण ठार

-नालायक लोक सगळ्या जातीत असतात…- नागराज मंजुळे

-मालेगाव बाँबस्फोट प्रकरणी कर्नल पुरोहित, साध्वी प्रज्ञा ठाकूरसह 7 जणांवर आरोप निश्चित!

-भाजपला मोठा धक्का; भाजपमध्ये नेत्यांची बंडखोरी

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या