Top News अहमदनगर महाराष्ट्र

लाचारी पत्करण्यापेक्षा काँग्रेसने सत्तेतून बाहेर पडावं- राधाकृष्ण विखे-पाटील

Photo Credit- Nana Patole Facebook Account

अहमदनगर | राज्यात विधानसभा निवडणुकीत जास्त जागा जिंकूनही भाजपला विरोधी पक्षात बसावं लागलं. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने एकत्र येत सत्ता स्ठापन केली. भाजप वारंवार सरकार पडणार असल्याचं म्हणत होतं. मात्र सरकारला पाहता पाहता एक वर्ष पुर्ण केलं. आता मध्येच काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाची नाना पटोलेंना देण्यात आली आहे. या सर्व घडीमोडींच्या पार्श्वभूमीवर भाजप नेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी काँग्रेसवर निशाणा साधला आहे.

राज्यात काँग्रेसचं अस्तित्व राहिलं नाही. राज्यातील सत्तेतही त्यांचं अस्तित्व नाही. काँग्रेसने आता इशारा देणं सोडून द्यावं. लाचारी पत्करून सत्तेत राहण्यापेक्षा काँग्रेसनं सत्तेबाहेर पडा, असा सल्ला राधाकृष्ण विखे-पाटलांनी काँग्रेसला दिला आहे. यावेळी त्यांनी वीजबिलावरूनही राज्य सरकारवर टीका केली आहे.

महाविकास आघाडी सरकार वीडतोडणीचं महान कार्य करत आहे. अगोदरच राज्यातील जनता आणी शेतकरी अडचणीत आहेत. त्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा हा प्रकार आहे. राज्य सरकारने मोफत वीज देण्याची घोषणा केवळ लोकप्रियता मिळवण्यासाठी केली होती.  आज धाकदडपशाहीने, दहशतीने नागरिकांकडून वीजबिलाची वसुली केली जात आहे. हे सरकार आपल्या घोषणा विसरलं असल्याचं राधाकृष्ण विखे-पाटील यांनी म्हटलं आहे.

दरम्यान, पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणात  राज्याची लक्तरे वेशीला टांगली जात असल्याचं म्हणत पाटलांनी राज्य सरकारवर टीका केली आहे.

थोडक्यात बातम्या-

‘राहुल गांधी यांनी आता लग्न करायला हवं’; केंद्रीय मंत्र्याच्या गांधींना सल्ला

पूजा चव्हाण प्रकरणी शिवसेना आक्रमक; संजय राठोडांना दिले ‘हे’ सक्त आदेश

IPS कृष्णप्रकाश अ‌ॅक्शन मोडमध्ये, अवैध धंदे करणारांची आता खैर नाही!

आता ट्रॅक्टरही सीएनजीवर, वर्षाला एक लाख रूपये वाचणा

कोण होती पूजा चव्हाण? का होतेय तिच्या आत्महत्येची एवढी चर्चा??

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या