बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

‘अदर पुनावाला डाकू, पंतप्रधान मोदींनी त्यांची कंपनी ताब्यात घेतली पाहिजे’; भाजप आमदाराचं वक्तव्य

नवी दिल्ली | सीरम इन्स्टिट्यूटने राज्य सरकारसाठी 400 रुपये आणि खासगी रुग्णालयांसाठी 600 रुपये प्रति डोस दराची घोषणा केली आहे. ‘कोविशील्ड’ लसीची किंमत ठरवण्यात आल्यानंतर गोरखपूरचे भाजपचे आमदार डॉ. राधामोहनदार अग्रवाल यांनी अदर पुनावाला यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. याबाबत त्यांनी ट्विट केलं आहे.

अदर पुनावाला हे डाकू आहेत. पंतप्रधान मोदी, अमित शाह, बी.एल. संतोष, डॉ. हर्षवर्धन यांनी तुमची कंपनी साथ रोग नियंत्रण कायद्या अंतर्गत ताब्यात घेतली पाहिजे, अशी मागणीही डॉ. राधामोहनदार अग्रवाल यांनी केली आहे.

डॉ. राधामोहनदार अग्रवाल यांनी केलेल्या वक्तत्यामुळे त्यांच्यावर टीका होत आहे. मात्ररम इन्स्टिट्यूटच्या म्हणण्यानुसार अमेरिकेच्या लशीची किंमत प्रति डोस 1500 रुपये आहे, रशियन लसची किंमत 750 रुपये आहे आणि चिनी लशीसाठी प्रति डोस 750 रुपये मोजावे लागत असल्याचं सीरमने सांगितलं आहे.

दरमयान, येत्या दोन महिन्यांत लस उत्पादनाचा वेग वाढेल. आमच्या एकूण उत्पादन क्षमतेच्या 50 टक्के लस भारत सरकार लसीकरण मोहिमेला आणि उर्वरित 50 टक्के राज्य सरकार आणि खासगी रुग्णालयांना देण्यात येईल. जगातील इतर कोणत्याही लसींच्या किंमतींपेक्षा आमची लस स्वस्त आहे, असं कंपनीने म्हटलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

राज्यातील 13 विद्यापीठांच्या परीक्षेबाबत उदय सामंत यांनी घेतला ‘हा’ मोठा निर्णय

“नाशिकचा कायापालट करतो अन्यथा तोंड दाखवणार नाही”; फडणवीसांच्या ‘त्या’ भाषणावर काँग्रेसच टीकास्त्र

…त्यानंतर औद्योगिक घटकांना ऑक्सिजनचा पुरवठा होणार सुरू- अर्थमंत्री निर्मला सीतारमण

ऑक्सीजन मास्क काढून कोरोनाबाधित रुग्ण गेला पळून; ‘या’ जिल्ह्यातील धक्कादायक प्रकार

दिलासादायक! ऑक्सिजन एक्सप्रेस विशाखापट्टनमला पोचली, लवकरच महाराष्ट्रात परतणार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. AcceptRead More