बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राधे माँच्या मुलाचं बॉलिवूडमध्ये पदार्पण, ‘या’ चित्रपटात साकारणार महत्त्वाची भूमिका

मुंबई | वादग्रस्त संत राधे माँ (Radhe Maa) उर्फ सुखविंदर कौर यांचा मोठा मुलगा लवकरच मोठ्या पडद्यावर झळकणार आहे. राधे माँ यांचा मोठा मुलगा हरजिंदर (Harjinder) लवकरच बॉलिवूडमध्ये (Bollywood) पदार्पण करणार असून तो अभिनेता रणदीप हुडासोबत (Randeep Hooda) स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

रणदीप हुडा याच्यासोबत ‘इन्स्पेक्टर अविनाश’ या चित्रपटात हरजिंदर महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. इन्स्पेक्टर अविनाश पाठोपाठ हरजिंदर दीपक तिजोरी दिग्दर्शित ‘टीप्सी’ या चित्रपटात देखील झळकणार आहे.

पाच ते सहा वर्षांचा संघर्ष केल्यानंतर हरजिंदरला ही संधी मिळाली आहे. या क्षेत्रात आल्यानंतर तो त्याची ओळख लपवायचा. अनेक ऑडिशन दिले मात्र त्याने राधे माँचा मुलगा असल्याची ओळख सर्वांपासून लपवून ठेवली. राधे माँसोबत कधीच आई-मुलाचं नातं नव्हतं याची आयुष्यभर खंत वाटेल, असं हरजिंदरने एका मुलाखतीत सांगितलं.

दरम्यान, मी तीन ते चार वर्षांचा होतो तेव्हा राधे माँ यांनी संसाराचा त्याग केला. माझ्या आजीने मला आणि माझ्या लहान भावाला वाढवलं. माझे वडीलही त्यावेळी परदेशात राहत होते. मी राधे माँ यांना नेहमी एका भक्ताप्रमाणे भेटत आलोय, असंही हरजिंदर याने सांगितलं आहे.

थोडक्यात बातम्या-

11 लाखांच्या पैठणीवरून ट्रोल करणाऱ्यांना आदेश भाऊजींनी फटकारलं, म्हणाले..

“चार दिवस काय चार वर्षे उद्धव ठाकरेंनी माझी चौकशी करावी, कारण…”

“मुंबईत तुमची ताकद नाही, त्यामुळं तुम्ही कोणलातरी पकडून…”; संजय राऊतांचा हल्लाबोल

संजय राऊतांनी भाजपवर केलेल्या गंभीर आरोपाने राज्यात खळबळ

जो बायडन युक्रेनला जाणार?, ‘ही’ महत्त्वाची माहिती समोर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More