Radhika Apte | बाॅलिवूड अभिनेत्री राधिका आपटेने एका गोंडस मुलीला जन्म दिला आहे. लग्नाच्या 12 वर्षानंतर राधिका आई बनली आहे. आज पर्यंत राधिकाने अनेक बाॅल्ड, इंटिमेट सिन शूट केले आहेत. त्यामुळे तिने प्रेक्षकांच्या मनामध्ये घर केलं.
आपल्या प्रोफेशनल लाईफबरोबरच राधिका तिच्या पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते. सोशल मीडियावर ती कायम सक्रिय असते. अशातच राधिकाने तिच्या चाहत्यांसाठी तिचे प्रेग्नंसीचे फोटो शेअर केले आहे, ज्याची चर्चा सगळीकडे रंगलीये.
राधिकाने शेअर केलं बेबी बंपचे फोटो-
राधिकाने (Radhika Apte) मुलीला जन्म देण्याच्या एक आठवड्यापूर्वी फोटोशूट केलं आहे. दरम्यान, ते फोटो तिने काही ताासांपूर्वी आपल्या अधिकृत इंस्टाग्राम अकाउंटवर शेअर केले आहे. फॅशनिस्टा आणि बोल्ड अंदाजात राधिका बेबी बंप फ्लाँट करताना दिसली.
काहीच मिनिटांमध्ये राधिकाचे फोटो व्हायरल झाले आहेत. एका मुलाखती दरम्यान, बोलत असताना राधिकाने तिच्या प्रेग्नंसीविषयी भाष्य केलं आणि त्याकरताच तिने हे फोटोशूट केलं आहे.
View this post on Instagram
नेट असणाऱ्या ड्रेसचा वापर –
फोटोशूटच्या वेळेस राधिकाने (Radhika Apte) एकदम बोल्ड लूक केला होता. शूट दरम्यान, राधिकाने संपूर्ण नेट असणाऱ्या ड्रेसचा वापर केला आहे, तर एक लूक डीप नेक ट्रान्सपरंट ड्रेसमधील आहे. तिसऱ्या लूकमध्ये तिचे बेबी बम्प उघडपणे दिसेल असाल वेटलूक ड्रेस परिधान केला आहे. तिन्ही ड्रेसमध्ये राधिकाने कमीतकमी मेकअप आणि स्लीक हेअरस्टाइलला पसंती दिली आहे. सध्या राधिकाच्या या फोटोची जोरदार चर्चा रंगली आहे.
News Title : radhika apte shares pregnancy photos
महत्त्वाच्या बातम्या-
आरक्षण मिळालं की सोन्याचे कौल आपल्या घरावर बसत नाही? भुजबळ स्पष्टच बोलले
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष पदासाठी ‘हे’ 5 दिग्गज नेते शर्यतीत! कोणाची वर्णी लागणार?
“अजित पवारांनी पाठीत खंजीर खुपसला”, भुजबळ समर्थकांची जोरदार बॅनरबाजी
ठाकरे-फडणवीसांच्या भेटीवर एकनाथ शिंदेंची शेलक्या शब्दांत टीका!
काळजी घ्या! थंडी आणखी वाढणार?, ‘या’ जिल्ह्यांसाठी IMD कडून अलर्ट