मुंबई | विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी भारिपचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांना एक पत्र लिहिलं आहे. या पत्रात त्यांनी आगामी लोकसभेचे जागावाटप आणि आरएसएसला संविधानिक चौकटीत आणण्याविषयीची काँग्रेस आणि त्याबरोबरच आघाडीची भूमिका मांडली आहे.
आतापर्यंत देशभरातील भाजपप्रणीत मोदी सरकारचा कारभार पाहिल्यानंतर असं लक्षात येतं की त्यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे संविधान डावलून मनमानी कारभार करायचा आहे. आगामी लोकसभा निवडणुक ही संविधानवादी विरूद्ध मोदी सरकार अशी असेल.. त्यात आपलाही सहभाग असावा अशी आमची इच्छा आहे, असं विखे पाटील यांनी पत्रात म्हटलंंय.
आरएसएसला घटनेच्या चौकटीत आणण्याविषयी आपण एक ड्राफ्ट तयार करावा आणि तो आम्हाला द्यावा, असंही विखे पाटील म्हणाले आहेत.
जागावाटपाबाबत चर्चा करून योग्य मार्ग निघू शकतो, असं म्हणत त्यांनी एकंदरित पत्रामध्ये प्रकाश आंबेडकर यांना आघाडीमध्ये येण्याचं निमंत्रण दिलं आहे, असंच म्हणावं लागेल.
– विखे पाटलांनी प्रकाश आंबेडकरांना लिहिलेलं पत्र-
महत्वाच्या बातम्या-
–‘तम्मना भाटिया आणि विराटच्या अफेअरच्या चर्चा, त्यावर तमन्ना म्हणते…..!’
–सचिन तेंडूलकरचा विंग कमांडर अभिनंदन यांच्यासाठी खास संदेश
-“राज ठाकरे ज्योतिषी, मी माझी पत्रिका त्यांना दाखवून घेणार, कारण त्यांना माहिती होतं…!”
–‘नागराज मंजुळे आता लोकांना मालामाल करणार…!’
–राष्ट्रवादी म्हणते, दाजी हे वागणं बरं नव्हं….! दानवेंना राष्ट्रवादीचा मार्मिक टोला
Comments are closed.