औष्णिक वीज निर्मिती केंद्रात भीषण स्फोट; 16 जणांचा मृत्यू 100 जखमी

लखनऊ | एनटीपीसी प्रकल्पात भीषण स्फोट झाल्याने 16 जणांचा मृत्यू झालाय तर 100 जण जखमी झालेत. उत्तर प्रदेशच्या रायबरेलीमध्ये ही धक्कादायक दुर्घटना घडलीय. 

उंचाहार औष्णिक वीज निर्मिती केंद्राच्या बॉयलरमध्ये हा स्फोट झाला. तातडीने मदतकार्य सुरु करण्यात आलंय मात्र अनेकजण गंभीर जखमी असल्याने मृतांचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. 

बॉयरलचा स्टीम पाईप फुटल्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं कळतंय. राष्ट्रीय आपत्ती निवारण पथकाचे जवान घटनास्थळी पोहोचले असून मदतकार्य सुरु आहे.