राफेल प्रकरणी ‘भाजप’ देशभरात एकाच वेळी करणार ही रेकाॅर्डब्रेक कृती

नवी दिल्ली | राफेल प्रकरणावरून देशाचं राजकारण चांगलंच तापलेलं पहायला मिळतंय. सोमवारी देशात भाजप एकाच वेळेस 70 पत्रकार परिषदा घेणार आहे.

राफेल विमान खरेदी प्रकरणात काँग्रेसने भाजपची चांगलीच कोंडी केली आहे. मात्र या प्रकरणी भाजपला सर्वोच्च न्यायालयात मोठा दिलासा मिळाला आहे.

शुक्रवारी राहुल गांधींनी राफेल प्रकरणी अतिशय आक्रमक अंदाजात पत्रकार परिषद घेतली होती. त्याला प्रत्युत्तर म्हणून भाजपने देशात एकाच वेळेस 70 पत्रकार परिषद घेण्याची रणनीती आखली आहे.

दरम्यान, भाजपशासित राज्यातील मुख्यमंत्री आणि विविध केंद्रीय मंत्री देशभरातील वेगवेगळ्या ठिकाणी ह्या पत्रकार परिषदा घेणार आहेत.

महत्वाच्या बातम्या –

-…म्हणून आम्ही हरलो; भाजपच्या खासदारानं कबुल केली हार

-कितीही शर्यत केली तरी ते जिंकू शकत नाहीत; कारण आमचं वजनच वेगळं!

-रामानंतर आता विठ्ठलाचा धावा; उद्धव चंद्रभागेच्या तीरी करणार आरती!

-भाजप-शिवसेना युती होणारच-रावसाहेब दानवे

“‘हर हर मोदी, घर घर मोदी’ नारा देणाऱ्या मोदी सरकारला शेवटची घरघर”