राफेल कराराबाबत न्यायालयाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली | राफेल लढाऊ विमान खरेदीप्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने मोदी सरकारला मोठा दिलासा दिला आहे. राफेल विमान खरेदीप्रकरणाची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्या सर्व याचिका न्यायलयाने फेटाळल्या आहेत.

राफेल लढाऊ विमान देशाची गरज आहे. राफेल विमान खरेदीप्रकरणात कोणताही संशय नाही. सरकारच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित करणं योग्य नाही, असं न्यायालयानं सुनावलं आहे.

भारताने जवळपास 58000 कोटी रुपयात 36 राफेल विमान खरेदी करण्याचा करार फ्रान्ससोबत केला होता. या खरेदीवर विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले होते.

दरम्यान, न्यायमूर्ती रजंन गोगोई यांच्या खंडपिठाने आजच्या सुनावणीत राफेलविरुद्धच्या सर्व याचिका फेटाळल्या.

महत्वाच्या बातम्या 

-निवडणुकीनंतर पहिल्यांदाच नरेंद्र मोदी-राहुल गांधी आले समोरासमोर आणि….

-राहुल गांधींनी नेतृत्व सिद्ध केलं- मा. गो. वैद्य

-मोदींची जात दाखवत सचिन पायलट यांची मुख्यमंत्री पदाची दावेदारी

-मोदींच्या बैठकीला महाराष्ट्रातील 4 भाजप खासदार गैरहजर

-अरारारारा खतरनाक…. ‘मुळशी पॅटर्न’ आता येणार हिंदीत; असणार ‘हा’ मोठा कलाकार