राफेल प्रकरण झाकण्यासाठी सीबीआयचा वाद; भाजप खासदाराचा घरचा आहेर !

नवी दिल्ली | सीबीआयचा वाद हा अधिकाऱ्यांमधील युद्ध नसून राफेल प्रकरण झाकण्यासाठी हे प्रयत्न केले जात आहेत, असा आरोप भाजप खासदारानेच केला आहे. त्यामुळे भाजपला घरचा आहेर मिळाला आहे.

भाजपचे खासदार शत्रुघ्न सिन्हा यांनी हे आरोप केले असून आज जर माजी पंतप्रधान इंदिरा गांधी जिवंत असत्या तर मी काँग्रेसमध्ये असतो, असं त्यांनी सांगितलं.

आपण भाजप पक्ष सोडणार नसून हवं असेल तर पक्षाने मला बाहेरचा रस्ता दाखवावा असंही यावेळी शत्रूघ्न सिन्हांनी म्हटलं आहे.

दरम्यान, आपण विरोधी पक्षाशी सहमत असून तपास यंत्रणेला भाजप सरकारने संपवलं आहे, असंही ते म्हणाले.

महत्त्वाच्या बातम्या-

-लोकार्पण सोहळ्याच्या विरोधात होणार होतं आंदोलन; मात्र…

-आर. आर. आबांच्या पत्नी सुमनाताईला जिल्हाधिकाऱ्यांकडून सापत्नभावाची वागणूक!

-सरदार पटेलांमध्ये शिवाजी महाराजांचं शौर्य होतं- नरेंद्र मोदी

-देशाच्या महापुरुषांचा गौरव करणं हा गुन्हा आहे का?; मोदींचा सवाल

-रामप्रभूंची अवस्था ‘आई जेवू घालीना आणि बाप भीक मागू देईना’ अशीच

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या