कराड | कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील नामांकीत कंपन्यांनी घेतलेल्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये 25 लाखांच्या नोकरीचं पॅकेज आयटीच्या प्रगती शर्मा या विद्यार्थिनीने पटकावलंय.
मी कराडच्या कॉलेजला रडून रडून आले होते, मला मेडिकलला जायचं होतं, परंतु इंजिनीअरिंगला ऍडमिशन मिळाल्यानंतर मला भीती वाटत होती. मात्र येथील शिक्षकांच्या शिकवणीमुळे माझा इंजिनीअरिंगमधील इंटरेस्ट वाढला. आता मिळालेल्या यशाने मला आनंद झाला, अशी प्रतिक्रिया 25 लाखांच्या नोकरीचे पॅकेज मिळालेल्या प्रगती शर्माने टीव्ही 9 मराठीशी बोलताना दिली आहे.
कराडच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात यंदा हीरक महोत्सवी वर्ष साजरे करण्यात आले. त्यावेळी नामांकीत कंपन्यांनी कॅम्पस इंटरव्ह्यू घेतले.
या कॉलेजच्या कॅम्पस इंटरव्ह्यूमध्ये तब्बल 185 विद्यार्थ्यांना नोकरीची संधी मिळाली. यात सर्वोच्च 25 लाखांच्या नोकरीचं पॅकेज आयटीच्या प्रगती शर्मा या विद्यार्थिनीने पटकावलं आहे.
थोडक्यात बातम्या-
तांबेंनी हर्षवर्धन पाटलांवर केलेल्या ‘त्या’ टीकेला लेक अंकिता पाटलांचं प्रत्युत्तर, म्हणाल्या…
हरियाणातील भाजप सरकारला मोठा धक्का!
कामाला लागा, पोलिसांना घरे बांधून द्या- उद्धव ठाकरे
महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना; पेणमध्ये तीन वर्षीय चिमुरडीवर बलात्कार करून हत्या
सावधान! कोरोना लसीकरणाच्या नावाखाली तुमची फसवणूक होऊ शकते