बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नवज्योत सिंग सिद्धू म्हणजे पॉलिटिक्समधील राखी सावंत”

नवी दिल्ली | आगमी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापताना दिसत आहे. राजकीय पक्षांचे नेते एकमेकांवर टीका करत आहेत. अशातच पंजाबमधील सत्ताधारी काँग्रेस आणि विरोधी पक्ष असलेल्या आम आदमी पक्षाचे नेते राघव चढ्ढा यांनी पंजाब काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्यावर निशाणा साधला आहे.

नवज्योत सिंग सिद्धू यांनी आम आदमी पक्षाचे नेते आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर टीका केली होती. दिल्लीतही शेतकऱ्यांना निश्चित किमतीपेक्षा कमी भाव मिळत आहे. केजरीवाल सरकारने केंद्र सरकारचा खासगी मंडीचा कायदा लागू केला आहे. दिल्लीत शेतकऱ्यांना त्रास दिला जात आहे, असं नवज्योत सिंग सिद्धू म्हणाले होते. याला राघव चढ्ढा यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.

पंजाबच्या राजकारणामधील राखी सावंत नवज्योत सिंग सिद्धू यांना कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्या विरोधात सातत्याने बोलल्याबद्दल काँग्रेस हायकमांडने फटकारलं आहे. त्यानंतर त्यांनी आता अरविंद केजरीवाल यांना लक्ष्य केलं आहे. मात्र उद्यापर्यंत वाट पाहा ते परत कॅप्टन अमरिंदर सिंग यांच्यावर टीका करतील, असं राघव चढ्ढा म्हणाले. यावर सिद्धू यांनी पुन्हा पलटवार केला आहे

दरम्यान, असं बोललं जातं की माणूस हा माकडांचा वंशज आहे. तुमचा बुद्धिमत्ता पाहून मला असं वाटतं की तुम्हीही आहात, असं नवज्योत सिंग सिद्धू यांनी म्हटलं आहे. यावर आता राघव चढ्ढा काय बोलतात?, याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

पुण्यातील मानाच्या पाच गणपतींचं विसर्जन होणार ‘या’ वेळेत, मंडळांनी दिली माहिती!

‘पेट्रोल-डिझेल जीएसटीच्या कक्षात आणण्याची योग्य वेळ नाही’; अर्थमंत्री निर्मला सितारमण यांनी सांगितलं कारण

पोरांनो तयारीला लागा! पोलीस भरतीची तारीख जाहीर, वाचा संपूर्ण माहिती

ज्यावेळेस ‘ते’ येतील त्यावेळी ते भावी सहकारी – बाळासाहेब थोरात

पंतप्रधान मोदींना आपल्या मधुर आवाजात अमृता फडणवीसांनी दिल्या शुभेच्छा! पाहा व्हिडीओ

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More