Top News पुणे महाराष्ट्र

रावसाहेब दानवे जोड्याने मारायच्या लायकीचे- रघुनाथदादा पाटील

इंदापूर | शेतकरी आंदोलनावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांच्यावर टीका होताना दिसत आहे. अशातच शेतकरी संघटनेचे अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनीही दानवेंवर घणाघाती टीका केली आहे.

रावसाहेब दानवे हे जोड्याने मारायाच्या लायकीचे आहेत, त्यांच्याबद्दल जास्त बोलण्यात काही अर्थ नाही, असं रघुनाथदादा पाटील यांन म्हटलं आहे. इंदापूर तालुक्यात भिगवण येथे ते बोलत होते.

पक्षश्रेष्ठींचे लक्ष वेधून घेण्यासाठी दानवे अशा प्रकारची वक्तव्यं करतात. मात्र अशा प्रकारचं वक्तव्य करणं पक्षाच्या फायद्याचे आहे की तोट्याचे याचा विचार ते कधीच करत नसल्याचं पाटील म्हणाले.

दरम्यान, शेतकरी आंदोलनात चीन आणि पाकिस्तानचा हात असल्याचं वक्तव्य दानवेंनी केलं होतं.

थोडक्यात बातम्या-

नीता आणि मुकेश अंबानी झाले आजी-आजोबा; अंबानी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन

पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दगडफेकीनंतर जे. पी. नड्डांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..

नवीन संसद भवन हे आत्मनिर्भर भारताला साक्ष ठरणारं असेल- नरेंद्र मोदी

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत शिवसेनेने घेतला मोठा निर्णय!

देशातील ‘या’ नऊ राज्यांमध्ये ‘एक देश एक रेशन कार्ड’ योजनेची अंमलबजावणी

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या