महाराष्ट्र मुंबई

‘बाॅयकाॅट चायना’ म्हटलं तर ते आत्महत्या केल्यासारखं होईल- रघुनाथ माशेलकर

मुंबई | ‘आत्मनिर्भर भारत’ ही संकल्पना चांगली आहे. भारतानं पुढाकार घेत चायनीज अॅपवर बंदी घातली हे देखील योग्य केलं. यामुळे भारतातील नवीन स्टार्टअप उभे राहिले. मात्र बाॅयकाॅट चायना म्हटलं तर ते आत्महत्या केल्यासारखं होईल, अशी स्पष्टोक्ती जेष्ठ शास्त्रज्ञ रघुनाथ माशेलकर यांनी दिली आहे. लोकमतशी बोलताना त्यांनी अनेक प्रश्नांचा उहापोह घेतला आहे.

माशेलकर म्हणाले की, जेनेरिक उत्पादनात आपण जगात एक नंबर आहोत. मात्र फार्मा कंपनीला लागणारे एपीआय 70 टक्के चायनामधून येते. आपण जर बायकाॅट चायना केलं, तर आपले वैद्यकीय व्यवसाय शून्यावर जाईल. यासाठी आपण ‘कमीतकमी चायना’ भूमिका घेणं गरजेचं आहे, असं मत माशेलकर यांनी यावेळी व्यक्त केलं.

आत्मविश्वास असल्याशिवाय आत्मनिर्भर बनता येत नाही. यासाठी आत्मसन्मानाची सर्वात जास्त गरज असते. म्हणून मेक इन इंडिया या संकल्पनेची व्याख्या बदलणं गरजेचं आहे. आपण बाहेरून वस्तू आणून याठिकाणी त्याचे उत्पादन घेणं म्हणजे मेक इन इंडिया नव्हे.

म्हणूनच भारताला घाम गाळून मेहनत करणारे देखील गरजेचे आहेत आणि नवनवीन संशोधन करून पैसा उभे करणारे देखील हवे आहेत. यांचा समन्वय साधणारी मेक इन इंडियाची व्याख्या असावी, असं मतही त्यांनी यावेळी व्यक्त केलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

महाराष्ट्राची आणखी एक संस्था गुजरातला हलवली, दुर्दैव म्हणजे राजकारण्यांनी ब्र देखील काढला नाही!

कोरोना अलर्ट… जागतिक स्तरावर कोरोनाचा मृत्यूदर तब्बल ‘इतक्या’ पटीनं वाढला!

पुणेकरांना दिलासा! एकाच दिवशी मिळाल्या ‘या’ दोन बड्या गुडन्यूज

सुशांत आत्महत्या प्रकरणाचा तपास योग्य दिशेने सुरू आहे- अनिल देशमुख

अजितदादांना मुख्यमंत्री बनलेलं बघायचंय, राखीपोर्णिमेनिमित्त बहिणीची इच्छा

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या