महाराष्ट्र मुंबई

“शेतकरी कर्जमाफी केली नाही तर हे सरकार 5 वर्षे टिकणार नाही”

मुंबई | राज्यावर आधीच कर्जाचा बोजा असताना राज्यातील अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान झाले आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आज बैठक घेतली. अशातच शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी यांनी एक भाकीत वर्तवलंय. राज्यासाठी लवकरच महत्त्वाचे निर्णय घेतले जाणार आहे. यासाठी उद्या महत्त्वाची बैठक बोलवण्यात आली आहे.

देवेंद्र फडणवीस यांनी कशीबशी पाच वर्ष काढली. पण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांची कर्जमाफी केली नाही तर हे सरकार  5 वर्ष टिकणार नाही, असं भाकित पाटील यांनी वर्तवलं आहे. ते पंढरपूरमध्ये बोलत होते.

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेने आपल्या जाहिरनाम्यात शेतकरी कर्जमाफीबाबत आश्वासन दिलं होतं. आता त्यांना सत्तेत बसण्याची संधी सुद्धा मिळाली आहे. शेतकरी संघटना 12 डिसेंबरपर्यंत संपूर्ण कर्जमाफी करा अन्यथा सरकार विरोधात आंदोलन करावं लागेल, असा इशाराही रघुनाथ पाटील यांनी दिला.

दरम्यान, उद्धव ठाकरे यांनी आरे मधील मेट्रो कारशेड आणि नाणार आंदोलकावरील गुन्हे मागे घेतले. हे निर्णय ज्या वेगाने घेतले त्याच पद्धतीने शेतकऱ्यांच्या संपूर्ण कर्जमाफीचा निर्णय त्यांनी घ्यावा, अभ्यास करतोय, माहिती घेतो. अस सांगत राहिले तर त्याचं सरकार 5 वर्षे टिकणार नसल्याचा इशारा पाटील यांनी दिला.

महत्वाच्या बातम्या- 

 

 

 

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या