“मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी”, शेतकरी नेत्याची सरकारवर टीका

Raghunath Patil | लोकसभा निवडणुकीत राज्यामध्ये महायुतीचं पारडं हे महाविकास आघाडीच्या तुलनेत हलकं होतं. यामुळे आता आगामी विधानसभा निवडणुकीत याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. यामुळे आता महायुतीने आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेता, यंदाच्या अर्थसंकल्पात अनेक महिलांसाठी योजनांच्या घोषणा केल्या.  त्यातीलच ‘लाडकी बहीण योजने’ बाबत शेतकरी नेते रघुनाथराव पाटील (Raghunath Patil) यांनी सरकारवर निशाणा साधत टोला लगावला आहे.

नुकताच महाराष्ट्राचा अर्थसंकल्प सादर करण्यात आला होता. या अर्थसंकल्पात महिलांसाठी योजना राबण्यात आल्या आहेत.  त्यात  ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना’, ‘मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना’ याची जोरदार चर्चा आहे. यातील मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून महिलांना महिन्याला 1500 रूपये मिळणार आहेत. तसेच मुख्यमंत्री अन्नपूर्णा गॅस योजनेच्या माध्यमातून वर्षाला तीन गॅस मोफत दिले जाणार आहेत.

“मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी”

अशातच आता शेतकरी नेते रघुनाथ पाटील (Raghunath Patil) यांनी लाडकी बहीण योजनेवरून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सत्ताधाऱ्यांना डिवचलं आहे. लाडकी बहीण योजना ही “मतांची झाली कडकी म्हणून बहीण झाली लाडकी”, असा मिश्कील टोला रघुनाथ पाटील (Raghunath Patil) यांनी लगावला आहे. तसेच त्यांनी योजनेच्या हेतूबाबत संशय स्पष्ट केला आहे.

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना थोडक्यात माहिती

ही योजना फसवी आहे. ही योजना राजकीयदृष्ट्या उद्देशाने जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत महिलांना महिन्याला 1500 रूपये देण्यात येणार आहेत. पण महिलांना पैसे देण्यासाठी सरकार एवढे पैसे कुठून आणणार आहेत?, असा सवाल रघुनाथ पाटील (Raghunath Patil) यांनी केला आहे.

या योजनेसाठी महिलांना आता एका महिन्याचा कालावधी दिला आहे. यासाठी 31 ऑगस्टपर्यंत अर्ज दाखल करण्यात येणार आहे. अर्ज दाखल केलेल्या महिलांना महिना 1500 रूपये आर्थिक लाभ देण्यात येणार आहे. या योजनेत रहिवासी दाखला नसेल तर 15 वर्षांआधीचं रेशन कार्ड असावं, मतदार ओळखपत्र, शाळा सोडल्याच दाखला, जन्म दाखला या 4 पैकी कोणतेही ओळखपत्र ग्राह्य धरण्यात येणार आहे.

सदर योजनेतून 5 एकर शेतीची अट वगळण्यात आली आहे. या योजनेत लाभार्थी महिलांचा वयोगट 21 ते 60 वर्ष वयोगट ऐवजी 21 ते 65 वर्ष वयोगट करण्यात आला आहे.

News Title – Raghunath Patil Slam To State Government

महत्त्वाच्या बातम्या

भाजपला आणखी एक मोठा झटका; माजी आमदार तुतारी हाती घेणार?

विश्वचषक जिंकणारा रोहित शर्मा ट्रोल; प्रोफाइल फोटोवरून सुरू झाला नवा वाद

“वरळी अपघातातील आरोपीचे मुख्यमंत्र्यांशी घनिष्ठ संबंध, आरोपी सुरतला पळाला की गुवाहाटी?”

राज्यात अतिवृष्टीचा हजारो शेतकऱ्यांना फटका; बळीराजा पुन्हा हवालदिल

अभिनेत्याची भरपावसात ड्युटी बजावणाऱ्या पोलिसांसोबत सेल्फी, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल