पुणे | केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी शेतकरी आंदोलनाबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांच्यावर जोरदार टीका होत आहे. यावेळी शेतकरी संघटनेते अध्यक्ष रघुनाथदादा पाटील यांनीही टीका केली. मात्र रघुनाथदादांनी दानवेंवर टीका करताना माजी मुख्यमंत्री आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्यावरही निशाणा साधला.
भारतीय जनता पक्ष बुडवण्यास रावसाहेब दानवे आणि देवेंद्र फडणवीस हे दोघे जबाबदार असल्याचं रघुनाथदादा पाटील यांनी म्हटलं आहे. इंदापूर तालुक्यातील भिगवण येथे ते बोलत होते.
दानवे कधी शेतकऱ्यांना ‘साले’ म्हणतात, तर कधी वेगवेगळी वक्तव्ये करतात. हा माणूस जोड्याने मारायच्या लायकीचा आहे. त्यांच्याबद्दल जास्त बोलण्यात काही अर्थ नसल्याचंही पाटील म्हणाले.
दरम्यान, शेतकरी आत्महत्यांचा कलंक पुसण्यासाठी शेतकरी संघटनेने 28 नोव्हेंबरपासून ‘जनप्रबोधन यात्रा’ सुरु केली आहे. ही यात्रा भिगवण येथे पाहोचली आहे.
थोडक्यात बातम्या-
“नवे संसद भवन हा अतिशय प्रभावी प्रकल्प”
शरद पवारांकडे UPA च्या अध्यक्षपदाची जबाबदारी?
रावसाहेब दानवे जोड्याने मारायच्या लायकीचे- रघुनाथदादा पाटील
नीता आणि मुकेश अंबानी झाले आजी-आजोबा; अंबानी कुटुंबात नव्या पाहुण्याचं आगमन
पश्चिम बंगालमध्ये झालेल्या दगडफेकीनंतर जे. पी. नड्डांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले..