Top News अहमदनगर महाराष्ट्र

”दिल्लीच्या आंदोलनात शेतकऱ्यांपेक्षा हमाल अधिक, हे सर्व भामटे लोक”

अहमदनगर |  केंद्राच्या कृषी कायद्या विरोधात दिल्लीमध्ये शेतकऱ्यांनी गेल्या 10 दिवसांपासून आंदोलन केलं आहे. शेतकऱ्यांच्या आंदोलनाला आता देशातून समर्थन दिलं जात आहे. मात्र अशातच महाराष्ट्रातील शेतकरी संघटनेचे नेते रघुनाथ पाटील यांनी दिल्लीतील आंदोलनावर घणाघाती टीका केली आहे.

दिल्लीतील शेतकऱ्यांच्या आंदोलनात काम करणारे हमाल अधिक आहेत. त्यामुळे हे आंदोलन शेतकऱ्यांचंं आहे असं आपण मानत नसल्याचं रघुनाथदादा पाटील यांनी म्हटलं आहे. अहमदनगरमध्ये ते बोलत होते.

दिल्लीतील आंदोलनात जे लोक गोळा झाले आहेत हे सर्व  भामटे आहेत. दिल्लीतील हे आंदोलन म्हणजे दुसरे शाहीनबागच सुरू झालं आहे. याच्यापेक्षा त्याला दुसरा अर्थ नसल्याचं पाटील यांनी सांगितलं.

दरम्यान, शेतकऱ्यांसंदर्भात याआधीही असे काही कायदे झाले आहेत.  त्या कायद्यांबाबत कोणीच बोलत नाहीत. त्या कायद्यांपासून जास्त त्रास शेतकऱ्यांना आहे. मात्र त्याबाबत कोणी एक शब्दही उच्चारायला तयार नसल्याचं रघुनाथदादा पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

‘मी देशातील प्रत्येक शेतकऱ्यासोबत उभा आहे’; रितेश देशमुखचाही शेतकरी आंदोलनाला पाठींबा

‘सोशल मीडियावर फक्त रिकामटेकडे लोक असतात’; कंगणा राणावतचा ‘तो’ व्हिडीओ व्हायरल

‘मिळालेला मंत्रिपदाचा तुकडा जपण्यासाठी बच्चू कडू…’; भाजपची मंत्री कडूंवर जहरी टीका

“पवारांचा कृषी कायद्यांच्या मूलतत्त्वांना विरोध नाही काही जण वाहत्या गंगेत हात धुताहेत”

“भाजपसोबत राहिलो असतो तर मुख्यमंत्री असतो, काँग्रेसमुळे सगळं संपलं”

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या