नवी दिल्ली | काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘आत्मनिर्भर भारत’ची घोषणा केली होती. यावर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी या अभियानावर प्रश्नचिन्ह उपस्थित केलंय.
राजन म्हणाले, सरकारच्या ‘आत्मनिर्भर भारत’ अभियानाचा परिणाम संरक्षणवादावर होऊ नये. यापूर्वीही अशा प्रकारची धोरणं अवलंबली गेली होती, मात्र त्याचा काही फायदा झालेला नाही.
आत्मनिर्भर भारतातून सरकारला नक्की काय म्हणायचं आहे हेदेखील अजून स्पष्ट झालं नाहीये. जर हे उत्पादनासाठी वातावरण तयार करण्याविषयी असेल तर ते ‘मेक इन इंडिया’ हा उपक्रम सादर करण्यासारखंच आहे, असंही राजन यांनी सांगितलंय.
महत्वाच्या बातम्या-
काँग्रेसने रावसाहेब दानवेंना दिली ‘या’ व्हिलनची उपमा
हाथरससारख्या गंभीर घटनेचा लोक स्वार्थासाठी, खुर्चीसाठी, राजकारणासाठी वापर करत आहेत- तनुश्री दत्ता
मास्कच्या किमतींवर नियंत्रण, अवघ्या 3 ते 4 रुपयात मिळणार मास्क- राजेश टोपे
प्रसिद्ध टिकटॉक स्टार प्रतिक खत्रीचा मृत्यू