देश

येत्या सहा महिन्यांत बुडीत कर्जात मोठी वाढ होऊ शकते- रघुराम राजन

नवी दिल्ली | रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी पुन्हा एकदा भारतातल्या बुडीत कर्जांसंदर्भात चिंता व्यक्त केली आहे.
येत्या सहा महिन्यांत बँकांच्या एनपीए-नॉन परफॉर्मिंग ऍसेटमध्ये लक्षणीय वाढ होऊ शकते. तसेच ही समस्या जितक्या लवकर ओळखली जाईल, तितकंच फायदेशीर ठरेल, असं रघुराम राजन यांनी म्हटलं आहे.

रघुराम राजन यांनी नॅशनल कौन्सिल ऑफ अप्लाइड इकॉनॉमिक रिसर्च आयोजित इंडिया पॉलिसी फोरम 2020 च्या अधिवेशनात सहभाग घेतला होता. त्यावेळी ते बोलत होते.

जर आम्हाला खरोखरच एनपीएची वास्तविक पातळी समजली, तर पुढील सहा महिन्यांत एनपीएची पातळी अगदीच अनपेक्षित होईल, असंही रघुराम राजन यांनी म्हटलं आहे.

जनधन खात्याची जाहिरात झाली, त्याप्रमाणे काम झाले नाही. भारतीय अर्थव्यवस्थेचे एक सकारात्मक परिणाम म्हणजे कृषी क्षेत्र आहे. हे क्षेत्र खरोखर चांगले काम करत आहे. अर्थातच मोदी सरकारने सुधारणांना वाव दिला आहे. तत्पूर्वी या सुधारणांची बराच काळ चर्चाच होत होती, आता त्यांची अंमलबजावणी झाल्यानं अर्थव्यवस्थेचा तो मोठा भाग ठरणार आहे, असं राजन म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

औरंगाबादच्या तरुणाच्या वेबपोर्टलची किमया; कोरोना काळात थेट गुगलनं केली आर्थिक मदत

‘भारताच्या जागतिक धोरणाची लक्तरे झालीयेत’; राहुल गांधींची मोदी सरकारवर टीका

मुलीचं प्रेम बापाला नव्हतं मान्य; पुण्यात प्रियकराची भररस्त्यात गोळ्या घालून हत्या

‘दोन दिवसात उत्तर द्या अन्यथा…’, सचिन पायलट यांना काँग्रेसची नोटीस

…म्हणून 25 वर्षीय महिलेनं महिला पोलिसाचा हात पिरगळला; महिलेला अटक

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या