बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

कोरोनाबाबत दूरदृष्टीचा अभाव आणि गाफीलपणा भोवला- रघुराम राजन

नवी दिल्ली | कोरोनाने देशभरात हैदोस घातला आहे. दिवसेंदिवस कोरोनाची आकडेवारी मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकीकडे कोरोना तांडव घालत असताना ऑक्सिजन तुटवडा, रूग्णांना बेड उपलब्ध नाही आणि रेमडेसिवीर इंजेक्शनचा काळाबाजार चालू आहे. याच पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे.

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेबाबत सरकार आधीपासूनच सतर्क राहिलं असतं तर त्यांनी तसं नियोजन केलं असतं. मात्र दुसऱ्या लाटेबाबत गाफील राहिल्यामुळेच कोरोनाचा देशात कहर झाला आहे. सरकारमधील कमकुवत नेतृत्व आणि दूरदृष्टीचा अभाव यामुळे कोरोनाच्या दुसऱ्या लाटेने देशात मोठं नुकसान केलं असल्याचं रघुराम राजन यांनी म्हटलं आहे.

सरकारमधील कोणी जगाकडे लक्ष दिलं असतं बाहेर कोरोनाची काय परिस्थिती आहे?, हे पाहिले असतंं तर कदाचित भारतात वाईट स्थिती ओढवली नसती, असंही रघुराम राजन म्हणाले. ब्राझीलमधल्या परिस्थितीतून बोध घेऊन सरकारने आणखी तयारीनिशी तयार असणं गरजेचं होतं, असं राजन यांनी सांगितलं.

दरम्यान, पहिल्या लाटेवर नियंत्रण मिळवल्यावर सरकारी यंत्रणा आत्मसंतुष्ट बनली आणि तिथेच घात झाला. गेल्या वर्षी पाहिल्या लाटेत रोजची रुग्णसंख्या एका लाखांवर गेली नव्हती. मात्र यावेळी त्यात तीनपटीने वाढ झाली आहे. तसेच देशात लसीकरण मोहिमेतील गोंधळ कोरोनाची साथ वाढण्यास कारणीभूत असल्याचं रघुराम राजन यांनी म्हटलं आहे.

थोडक्यात बातम्या- 

मोदींचे अनुमोदक छन्नूलाल मिश्रांचा भाजपला विसर, घडला अत्यंत धक्कादायक प्रकार

पंढरपूरची निवडणूक पुन्हा घेण्याच्या मागणीवर मोठा खुलासा, राष्ट्रवादी म्हणते ते पत्र खोटं!

रेमडेसिवीर वापराविना 91 वर्षीय आजोबांची कोरोनावर मात !

कोरोना संकटात भारताला ‘या’ जवळच्या मित्रदेशाने दिला मदतीचा हात, करणार ही मोठी मदत

कोंबड्या चोरुन नेल्याची अफवा, पुण्यात आरोपीनं केला काळजाचा थरकाप उडवणारा प्रकार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More