अर्थव्यवस्थेबाबत रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य, म्हणाले…

महत्त्वाच्या बातम्यांसाठी ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Telegram Channel Join Now

मुंबई | भारतीय अर्थव्यवस्थेबाबत रिझर्व्ह बँकेचे माजी गव्हर्नर आणि अर्थशास्त्रज्ञ रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. खासगी क्षेत्रातील गुंतवणूक, उच्च-व्याजदर आणि मंदावलेला जागतिक विकास पाहता भारत सध्या हिंदू विकासदराच्या (हिंदू रेट ऑफ ग्रोथ) उंबरठ्यावर आहे. ही बाब अर्थव्यवस्थेसाठी धोकादायक आहे, असं रघुराम राजन म्हणालेत.

रघुराम राजन (Raghuram Rajan) यांनी नुकताच पीटीआयला एक ईमेल इंटरव्ह्युव दिला आहे. त्यामध्ये त्यांनी हिंदू रेट ऑफ ग्रोथबद्दल चिंता व्यक्त केली आहे. 

आपण 5 टक्के विकासदर गाठला तर आपण नशिबवान ठरू, असं मला वाटतं होतं. पण, ऑक्टोबर ते डिसेंबरमधील भारतीय जीडीपीचे आकडे वर्षाच्या पहिल्या सहामाहीतील प्रमुख आकड्यांच्या तुलनेत घसरलेले दिसत आहेत. हे आकडे मंदावलेली वाढ सूचित करतात, असं रघुराम राजन (Raghuram Rajan) म्हणालेत.

खासगी क्षेत्र गुंतवणूक करण्यास तयार नसल्यामुळे, आरबीआय अजूनही दर वाढवत आहे. वर्षाच्या उत्तरार्धात जागतिक वाढ आणखी मंदावण्याची शक्यता आहे. अशा परिस्थितीमध्ये मला चिंता आहे की, आपल्याला अतिरिक्त वाढीचा वेग कसा आणि कुठे मिळेल, असं रघुराम राजन म्हणालेत.

महत्त्वाच्या बातम्या-