बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

रघुराम राजन यांचं मोदी सरकारवर टीकास्त्र, म्हणाले…

नवी दिल्ली | कोरोनामुळे भारतासकट जगाचीही अर्थव्यवस्था डबगाईला आली आहे. कित्येक देशांना कोरोनासाठी आर्थिक पॅकेज जाहीर करावं लागलं होतं. कोरोनाचा फटका भारताच्या अर्थव्यवस्थाला देखील बसला. आता कोरोना आटोक्यात येत असताना अर्थव्यवस्था पुन्हा उभारू लागली आहे. पण अशातच सरकार अर्थव्यवस्थेला नवी दिशा देण्याचा प्रयत्न करत आहे. यावरून आरबीआयचे माजी गव्हर्नर रघुराम राजन यांनी मोदी सरकारवर टीकास्त्र सोडलं आहे.

आर्थिक धोरणात मोेठे बदल केल्यास रोखे बाजारावर विपरीत परिणाम होऊ शकतात, असा गंभीर इशारा रघुराम राजन यांनी केंद्र सरकारला दिला आहे. सध्याच्या धोरणाद्वारे महागाई रोखण्यामध्ये तसेच विकासदर वाढीस मदत होत असल्याचं मत रघुराम राजन यांनी मांडलं आहे.

आर्थिक धोरणांमुळे महागाईवर नियंत्रण ठेवण्यास बरीच मदत झाली आहे. सध्याच्या स्थितीनुसार अर्थव्यवस्थेला बळकटी देण्यासाठी आरबीआयकडे सुद्धा मोठी संधी आहे. मात्र या सर्व घडामोडीत सरकारने आता आर्थिक धोरणात बदल केल्यास रोखे बाजारावर विपरीत परिणाम होऊ शकेल, असं राजन म्हणाले.

दरम्यान, 2024-25 पर्यत भारताची अर्थव्यवस्था 5 ट्रिलीयन डाॅलरवर पोहचवण्याचं केंद्र सरकारचं लक्ष्य आहे. सरकारने यंदाच्या अर्थसंकल्पात खाजगीकरणावर भरपूर जोर दिला आहे. पण तो अर्थव्यवस्थेसाठी फायदेशीर ठरणार नाही. खर्च आणि उत्पन्नाचा ताळमेळ बसत नसल्याचं दिसून येत आहे, असंही राजन याआधी म्हणाले होते.

थोडक्यात बातम्या- 

नितेश राणेंनी माझ्यावर केलेले सर्व आरोप सिद्ध करावेत, अन्यथा…- वरूण सरदेसाई

…असं काही झालं आणि 2 फुटी अजीम मन्सुरींसाठी वधूंची रांग लागली; ऐकूण तुम्हीही थक्क व्हाल!

ठाकरे सरकारकडून नवी नियमावली जाहीर; वाचा काय सुरू, काय बंद?

‘ममता बॅनर्जी यांची उमेदवारी रद्द करा’; भाजप नेत्यानं ममता बॅनर्जींवर केले धक्कादायक आरोप

पुणे शहरातील कोरोनाबाधितांची आजची धक्कादायक आकडेवारी

 

 

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More