उर्जित पटेल यांचा राजीनामा प्रत्येक भारतीयासाठी चिंतेचा विषय- रघुराम राजन

नवी दिल्ली | भारताच्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यावर माजी गव्हर्नर रघुराम राजन यांची प्रतिक्रिया आली आहे. उर्जित पटेल यांचा राजीनामा प्रत्येक भारतीयासाठी चिंतेचा विषय आहे, असं त्यांनी म्हटलं आहे.

उर्जित पटेल यांनी राजीनामा देताना ज्या भावना व्यक्त केल्या त्याचा आपण आदर केला पाहीजे आणि राजीनामा देण्याच्या निर्णयापर्यंत पटेल यांना का जावं लागलं याचाही विचार करावा लागेल, असं मत रघुराम राजन यांनी व्यक्त केलं आहे. 

देशाच्या विकासासाठी प्रत्येक भारतीयानं देशातील संस्था बळकट करण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत, अशी आशा रघुराम राजन यांनी व्यक्त केली आहे. 

दरम्यान, रघुराम राजन यांच्यानंतर 2016 मध्ये उर्जित पटेल यांनी रिझर्व्ह बँकेची सुत्रे स्वीकारली होती.

महत्वाच्या बातम्या –

-70 वर्षात जे घडलं नाही ते आता घडलं; याचं श्रेय फक्त मोदींना- जितेंद्र आव्हाड

-अखेर विजय मल्ल्याचा खेळ खल्लास; लवकरच मल्ल्याला भारतात आणणार!

-धुळे महापालिकेच्या विजयी उमेदवारांची यादी जाहीर, पाहा कोण कोण जिंकलं…

-अॅड. गुणरत्न सदावर्तेंवर हल्ला करणारा वैजिनाथ पाटील नेमका आहे कोण?

-भाजपच्या पराभवाच्या भीतीनं शेअरबाजारात मोठे हादरे