पुणे | तमाशाने कोणी बिघडत नाही आणि कीर्तनाने कोणी सुधरत नाही, असं वक्तव्य प्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांनी केलं आहे. निवृत्ती महाराजांच्या वादग्रस्त वक्तव्यानंतर, तमाशाकडे गेलेला माणूस त्यांनी कीर्तानाकडे आणला, असं त्यांच्या समर्थकांनी म्हटलं होतं. यावर खेडकरांनी आपली बाजू मांडत इंदोरीकारांच्या समर्थकांना चपराक लगावली आहे.
तमाशा वाईट नाही त्याला बदनाम करू नका. तमाशाला साडेतीनशे वर्षाचा इतिहास आहे. या कलेकडे लोक चुकीच्या अर्थाने पाहतात. ग्रामीण भागातील लोकांना तमाशा आवडतो, त्यांनीच या कलेला बळ दिलं असल्याचं खेडकर यांनी सांगितलं आहे.
तमाशाला तुच्छ लेखणं चुकीचं आहे. तमाशाच्या वगनाट्यातून लोकांच्या हिताचे विचार देण्याचं काम आम्ही तमाशा कलावंत करत आहेत. तमाशा दु:ख विसरायला लावतो आणि कीर्तनात भक्ती शिकवली जाते, असं खेडकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, इंदोरीकरांनी जिल्हा शल्य चिकीत्सक विभागत आपली बाजू मांडत आपण ते वक्तव्य केलं नसल्याचं म्हणत कोलांटउडी मारली आहे.
ट्रेंडिंग बातम्या-
अयोध्येत बुद्ध मंदिरासाठी जमीन द्या अन्यथा…- रामदास आठवले
सर्व मुस्लिमांना 1947 मध्येच पाकिस्तानात पाठवायला हवं होतं- गिरीराज सिंह
महत्वाच्या बातम्या-
“राधाकृष्ण विखे पाटील लवकरच महाविकास आघाडीत दिसतील”
शरद पवारांचं ते वक्तव्य समाजात तेढ निर्माण करणारं- विश्व हिंदू परिषद
आता 12 वीचा एकही विद्यार्थी नाही होणार नापास! कसं ते जाणून घ्या..
Comments are closed.