नाशिक | राज्यातील सुप्रसिद्ध तमाशा कलावंत रघुवीर खेडकर यांच्या तमाशाच्या फडावर जीवघेणा हल्ला झाल्याची घटना समोर आली आहे. नाशिक जिल्ह्यातील साकूर येथे हा धक्कादायक प्रकार घडला आहे.
आमचा दुसरा फड तुकाराम खेडकर सह पांडुरंग मुळे मांजरवाडीकर या फडाला नाशिक जिल्ह्यातील साकूर या गावी रात्री कार्यक्रम सुटल्यानंतर काही लोकांनी हल्ला करुन कलावंतांना जखमी केलं. लाकडी काठ्या आणि दांडक्यांच्या साहाय्याने कलावंतांच्या तोंडावर आणि डोक्यात वार करण्यात आले, असं रघुवीर खेडकर यांनी एका व्हीडिओद्वारे सांगितलं आहे.
आमच्या तीन पिढ्या महाराष्ट्राचं प्रबोधन करण्यासाठी झटल्या आहेत. तमाशा कलावंत मुजोर नाहीत त्यामुळे त्यांना अशाप्रकारे वागणूक देऊ नका. अशाप्रकारचे हल्ले होत असतील तर आम्ही जगायचं कसं?, ही अत्यंत निंदनीय बाब आहे. आम्ही दाद मागायची तरी कुणाकडे?, सरकारने या प्रकरणात लक्ष घालावे आणि तपास करुन दोषींना शिक्षा द्यावी, अशी मागणी देखील रघुवीर खेडकर यांनी केली आहे.
दरम्यान, सार्वजनिक कार्यक्रमाची वेळ संपल्याने तमाशा कलावंतांनी कार्यक्रम थांबवण्यात आला होता. पण काही तमाश शौकिनांना याचा राग अनावर झाला. त्यांनी कार्यक्रम पुन्हा सुरू करा अशी दमदाटी करत त्यांना मारहाण केली.
…तर आमदारकीचाही राजीमाना देईल- तानाजी सावंत
महाविकास आघाडी सरकारचं लवकरच सीझर होणार- बबनराव लोणीकर
महत्त्वाच्या बातम्या-
तुम्ही करा मिशन कमळ… आमच्याकडे हात अन् धनुष्यबाण आहेच; भुजबळांचा टोला
“माझ्याभोवती माता-भगिनींचं सुरक्षा कवच; लाठ्यांचा काहीही परिणाम होणार नाही”
मोदींकडे वागण्याची, बोलण्याची कसलीच पद्धत नाही; राहूल गांधींची टीका
Comments are closed.