बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नरेंद्र मोदींची आता झोळी घेऊन जाण्याची वेळ आली”

नवी दिल्ली | उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुका सध्या चर्चेचा विषय आहे. या निवडणुकीच्या चर्चासत्रात बोलताना काँग्रेस प्रवक्त्या रागिणी नायक यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधला आहे. मोदींना ना कोरोना आवरता येतोय ना सत्ता. असं वाटतंय की आता झोळी घेऊन निघून जाण्याची वेळ आली आहे, अशा शब्दात रागिनी नायक यांनी नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि नरेंद्र मोदी दोघेही एकमेकांवर वरचढ होण्यासाठी पाहत आहेत. तर दुसऱ्या बाजूला मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांचं एकमेकांशी पटत नाही. भाजपशासित राज्यांमध्ये नुसता गोंधळ माजला असल्याचं रागिनी नायक यांनी म्हटलं आहे.

कोरोना असो नाहीतर सत्ता दोन्हीही मोदीजींच्या हाताबाहेर जाऊ लागलेत. आता असं वाटतंय की बहुतेक झोळी घेऊन निघून जाण्याची वेळ आलेली आहे, असं रागिनी नायक यांनी म्हटलं आहे. यासंदर्भात त्यांनी ट्विट केलं आहे.

दरम्यान, कोरोना महामारीमुळे अनेकांना आपला प्राण गमवावा लागला. कोरोनामुळे झालेल्या स्थितीवरूनही विरोधकांनी निशाणा साधला आहे. रागिनी नायक यांच्या टीकेला भाजप काय प्रत्युत्तर देतं हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

 

थोडक्यात बातम्या- 

‘या’ मंदिरात दर्शनासाठी लागणार लसीकरण प्रमाणपत्र!

पेरण्या खोळंबलेल्या शेतकऱ्यांना दिलासा; ‘या’ जिल्ह्यात दमदार पावसाची हजेरी

‘लोकांनी भरलेल्या ‘टॅक्स’मधून लसीकरण केलं म्हणजे उपकार नाही’; पवारांनी युजीसीवर साधला निशाणा

‘जयललिता’ नंतर आता ‘इंदिरा गांधी’च्या भूमिकेत झळकणार कंगना रणौत

‘या’ जिल्ह्यातील 30 कोविड सेंटर बंद करण्याचा जिल्हाधिकाऱ्यांचा निर्णय; आरोग्य कर्मचारी बेरोजगार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More