नवी दिल्ली | मी पंतप्रधान असतो तर रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यावर माझा भर असता. मी विकास केंद्रीत राजकारणापेक्षा रोजगार उपलब्धतेवर भर दिला असता, असं काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी सांगितलं आहे.
नरेंद्र मोदींना पर्याय म्हणून राहुल गांधी यांच्याकडे पाहिलं जातं, त्यामुळे जर तुम्ही पंतप्रधान असता तर काय केले असते असा प्रश्न राहुल गांधींना एका मुलाखतीत विचारण्यात आला. यावर राहुल गांधींनी उत्तर दिलं. ते अमेरिकेचे माजी राजदूत निकोलस बर्न्स यांनी घेतलेल्या ऑनलाईन मुलाखतीत बोलत होते.
आपल्याला विकासाची गरज आहे, परंतु त्याचसोबत उत्पादन क्षमता वाढवणे, आणि रोजगाराच्या संधी देणे यासाठी सर्वकाही केले असते. तसेच सध्या आपला विकास पाहिला तर रोजगार निर्मिती, अतिरिक्त सुविधा आणि उत्पादन यांच्यात जसा ताळमेळ असायला हवा तसा दिसत नाही, असं राहुल गांधी म्हणाले.
मी लॉकडाऊनच्या सुरुवातीला सांगितलं शक्तीचं विकेंद्रीकरण केलं जावं, परंतु काही महिन्यानतर केंद्र सरकारला ही गोष्ट कळाली, तोपर्यंत भरपूर नुकसान झालं होतं, आता फक्त एकच उपाय आहे की, लोकांच्या हातात पैसा द्यावा, त्यासाठी काँग्रेस न्याय योजनेचा विचार करत आहे, असं राहुल गांधींनी सांगितलं.
थोडक्यात बातम्या-
“माझे कुटुंब माझा जबाबदारी म्हणणारे मुख्यमंत्री स्वत:चं कुटुंब सुरक्षित ठेवू शकले नाहीत”
सचिन वाझे यांच्या प्रकृतीला धोका, वैद्यकीय तपासणीत ‘ही’ धक्कादायक बाब उघड
भारताच्या हद्दीत चुकून घुसला पाकिस्तानी मुलगा, त्यानंतर जे घडलं ते ऐकून तुम्हालाही अभिमान वाटेल!
‘तुमचं वजन वापरून बघा काय मिळतंय का?’; आव्हाडांचा फडणवीसांना टोला
बोंबला! बॉयफ्रेन्डची हत्या करून वडिलांसोबत केलं लग्न, प्लॅन करून तिघांनी केला त्याचा खात्मा!
Comments are closed.