Rahu-Ketu Transit | वैदिक ज्योतिषानुसार, यंदा होळी (Holi 2025) सण 14 मार्च रोजी साजरा केला जाणार आहे. यंदाची होळी खास असणार आहे कारण या दिवशी सूर्य ग्रहाचे संक्रमण होणार आहे. मात्र, यानंतर लगेचच 16 मार्च रोजी राहू आणि केतू ग्रहांचे नक्षत्र परिवर्तन होणार आहे, ज्याचा प्रभाव काही विशिष्ट राशींवर मोठ्या प्रमाणात दिसून येईल. जाणून घ्या कोणत्या राशींवर याचा वाईट परिणाम होणार आहे. (Rahu-Ketu Transit )
मेष राशी
राहू-केतूच्या नक्षत्र परिवर्तनामुळे मेष राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत आव्हानात्मक ठरू शकतो. वैवाहिक जीवनात तणाव निर्माण होण्याची शक्यता आहे, तसेच जोडीदाराच्या आरोग्याबाबत चिंता सतावू शकते. सततच्या समस्यांमुळे मानसिक तणाव वाढण्याची शक्यता आहे. आरोग्याच्या बाबतीत विशेष काळजी घेणे गरजेचे आहे. एखाद्या गंभीर आजाराची लक्षणे दिसल्यास दुर्लक्ष करू नका.
कन्या राशी
राहू-केतूच्या संक्रमणामुळे कन्या राशीच्या लोकांसाठी हा काळ आव्हानात्मक असेल. या काळात कामाच्या ठिकाणी महत्त्वाचे बदल होऊ शकतात. काही अनपेक्षित परिस्थितींमुळे नोकरी किंवा व्यवसायात अडथळे येऊ शकतात. यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो. कोणत्याही मोठ्या निर्णयापूर्वी विचार करूनच पुढे जावे, अन्यथा पश्चात्ताप करण्याची वेळ येऊ शकते. (Rahu-Ketu Transit )
मीन राशी
मीन राशीच्या व्यक्तींना आर्थिक नुकसानीचा सामना करावा लागू शकतो. त्यामुळे मोठ्या प्रमाणात गुंतवणूक करण्याचे टाळा. तसेच, लहान मुलांच्या आरोग्याबाबत सतर्क राहा. अचानक होणाऱ्या खर्चामुळे आर्थिक नियोजन बिघडण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा काळ संयमाने आणि विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे.
Title : Rahu-Ketu Transit Tough Time for These 3 Zodiac Signs