बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“कुणीही येतं, कुठेही बसायला बघतं, मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे तेवढी तरी राहुदे बाबा”

मुंबई | राज्यातील विधान भवनात हिवाळी अधिवेशन (Winter Session) सुरु झालं आहे. यंदा मुख्यमंत्र्यांच्या तब्येतीमुळे अधिवेशन नागपूरऐवजी मुंबईत पार पडत आहे. त्यामुळे पाच दिवसीय अधिवेशनात अनेक मुद्द्यांंवरुन वाद पहायला मिळाले. अशातच आता सदस्यांचे वर्तन कसे असते, कसं वागलं पाहिजे याची शाळा अजित पवार (Ajit Pawar) यांनी सभागृहात घेतली.

गेल्या काही वर्षांपासून काही सदस्यांच्या वर्तणूकीमुळे प्रतिमा काही प्रमाणात ढासळली आहे. ती अधिक ढासळू नये यासाठी सभागृहातल्या सदस्यांनी सभ्य वर्तणूक केली पाहीजे. सदस्यांचं वर्तन विधिमंडळाला शोभेल असं असावं. लाखो मतदार तुम्हाला निवडून देतात, तेव्हा तुम्ही या सभागृहाचे प्रतिनिधित्व करता. आपण कुत्रे, मांजरी या प्राण्यांचे प्रतिनिधित्व करत नाही, असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.

आम्ही आमदार झालो तेव्हा अध्यक्षांचा, मंत्र्यांचा किती दरारा होता. कोणी आलं तर त्यांना सभागृहात मान दिला जायचा. पण आता कुणीही येतं, कुठेही बसायला बघतं. इथेही येऊन बसतात. मुख्यमंत्र्यांची खुर्ची आहे तेवढी तरी राहुदे बाबा, तुला बसायचं आहे तर पाठिमागे बस, असं टीकास्त्रही अजित पवार यांनी सोडलं.

दरम्यान, नाव न घेता अजित पवार यांनी नितेश राणेे यांनी सुनावलं आहे. त्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात आरोप-प्रत्यारोपांची मालिका सुरुच असल्याचं पहायला मिळत आहे.

थोडक्यात बातम्या –

स्थापना दिनीच काँग्रेसचा झेंडा पडला खाली, ‘तो’ व्हिडीओ आला समोर

‘पराभूतसम्राट सांगे लोकांना, शेंबुड त्याच्याच नाकाला’; रुपाली ठोंबरेंचा हल्लाबोल

Corona: शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांना कोरोनाची लागण

“…तेव्हा कुठे गेला होता राजा सुता तुझा धर्म”; भास्कर जाधव कडाडले

पुढील दोन दिवस अवकाळी पावसाचा इशारा, ‘या’ भागात अलर्ट जारी

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More