बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“राहुल आणि प्रियंका गांधी अनुभवहीन आणि दिशाभूल झालेेले नेते”

नवी दिल्ली | देशातील राजकाणात काॅंग्रेस पक्षाला खूप महत्व आहे. 2014 ला नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपने काॅंग्रेसचा दारूण पराभव करत सत्ता हस्तगत केली. 2019 ला तर काॅंग्रेसची अवस्था पार बिघडून गेली होती. काॅंग्रेस पक्षाला उभारी देण्याचा प्रयत्न राहुल गांधी आणि प्रियंका गांधी करत आहेत. तर पंजाबचे माजी मुख्यमंत्री अमरिंदर सिंग यांनी या दोन्ही नेत्यांवर टीका केली आहे.

कॅप्टन अमरिंदर सिंग यांना मुख्यमंत्री पदावरून काढण्यात आल्यानंतर अमरिंदर सिंग यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली. प्रियंका गांधी आणि राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखालीच पंजाबचा निर्णय घेण्यात आला आहे. परिणामी अमरिंदर सिंग यांनी या दोन्ही नेत्यांवर जोरदार टीका केली आहे. राहुल आणि प्रियंका गांधी अननुभवी नेते आणि दिशाभुल झालेले नेते आहेत.

अमरिंदर सिंग यांनी पंजाब काॅंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नवज्योत सिंग सिद्धू यांच्या विरोधात आक्रमक पवित्रा घेतला आहे. अमरिंदर सिंग म्हणाले की, प्रियंका आणि राहुल यांचे मार्गदर्शक या दोघांची दिशाभूल करत आहेत. दोघीही माझ्या मुलांसारखे आहेत, असंही अमरिंदर सिंग म्हणाले आहेत.

पंजाब विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर पक्षातील बंड रोखण्याचं मोठं आव्हान प्रियंका आणि राहुल गांधी यांंच्यासमोर आहे. चरणजीत सिंग चन्नी यांना मुख्यमंत्री करून पंजाबमध्ये राहुल आणि प्रियंका यांनी सर्व जेष्ठ नेत्यांना एकप्रकारचा इशारा दिला आहे. अमरिंदर सिंग यांच्या या टीकेमुळं आता काॅंग्रेसमध्ये बंडाचं वातावरण आहे.

थोडक्यात बातम्या 

‘कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबियांना मिळणार इतके हजार रुपये’; केंद्राचं सर्वोच्च न्यायालात उत्तर

“महाराष्ट्राला चूड लावाल तर तुमची धोतरेही पेटतील हे विसरू नका”

नरेंद्र मोदी 3 दिवस अमेरिकेच्या दौऱ्यावर; मोदींंचं अमेरिकेत जंगी स्वागत

मला कोरोना झाल्यानंतर किती लोकांनी देव पाण्यात ठेवले माहित नाही, पण… – उदयनराजे भोसले

मोठी बातमी! एमपीएससी आयोगाने घेतला ‘हा’ महत्वाचा निर्णय

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More