बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“…तर सोनिया गांधी आणि राहुल गांधींचं नागरिकत्व रद्द होईल”

हैदराबाद | काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांचं नागरिकत्व लवकरच रद्द होईल, असा दावा भाजपचे खासदार सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांच्या नागरिकत्वाची फाईल अमित शहा यांच्या टेबलवर आहे. लवकरच त्यांना नागरिकत्व गमावावं लागू शकतं, असं वक्तव्य सुब्रमण्यम स्वामी यांनी केलं आहे. ते हैदराबादमध्ये एका कार्यक्रमात बोलत होते.

राहुल गांधी यांनी इग्लंडचं नागरिकत्व स्वीकारलं होतं. पण राहुल गांधी भारतीय नागरिकत्वासाठी पुन्हा अर्ज करू शकतात. कारण त्यांचे वडिल राजीव गांधी भारतीय होते, असा दावा सुब्रमण्यम स्वामी यांनी केला आहे.

दरम्यान, कोणतीही माहिती नसताना सुधारित नागरिकत्व कायद्याचा विरोध केला जातोय. मुळात विरोध करणाऱ्यांना या कायद्याबद्दल फारशी माहिती नाही, असंही सुब्रमण्यम स्वामी यांनी म्हटलंय.

ट्रेंडिंग बातम्या- 

“बांद्र्याच्या ‘मातोश्री’वरुन नाही तर दिल्लीच्या ‘मातोश्री’वरुन निर्णय होतात”

‘इंदोरीकर महाराजांचा हा व्हीडिओ बघाच’; रूपाली ठोंबरेंचा तृप्ती देसाईंना टोला

महत्वाच्या बातम्या- 

भाजपचा स्वभावच मूळात विरोधी पक्षाचा- सुधीर मुनगंटीवार

हे सरकार 5 वर्षे चालणार यात मला शंका वाटत नाही- शरद पवार

ना जातीचे ना धर्माचे छ. शिवाजी राजे रयतेचे- श्रीपाल सबनीस

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More