बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुल बजाज यांचा बजाज ऑटोच्या अध्यक्षपदाचा राजीनामा

नवी दिल्ली | देशातील सर्वात मोठी वाहन कंपनी असलेल्या बजाज ऑटोच्याच्या राहुल बजाज यांनी कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे. गेल्या 50 वर्षापासून बजाज ग्रुप ऑफ कंपनीशी ते जोडलेले आहेत. त्यांनी आपल्या वाढत्या वयाचं कारण देत कंपनीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला. त्यांच्याजागी आता कंपनीचे कार्यकारी संचालक नीरज बजाज यांची अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. ते १ मे पासून आपला पदभार स्वीकारणार आहेत.

राहुल बजाज यांनी 1965 मध्ये बजाज ग्रुपची जबाबदारी स्वीकारली होती. त्यांच्या नेतृत्त्वात कंपनीचा व्यवसाय 7.2 कोटीवरून 12 हजार कोटींवर गेला होता. त्यावेळी स्कुटर विकणारी आघाडीची कंपनी होती. 2005 मध्ये त्यांनी आपल्या मुलाकडे जबाबदारी देण्यास सुरूवात केली होती. राजीव बजाज असं त्यांच्या मुलाचं नाव आहे.

राहुल बजाज यांचा जन्म 10 जून 1938 रोजी बंगाल प्रेसिडेन्सी (स्वातंत्र्यपूर्व पश्चिम बंगाल) मधील मारवाडी कुटुंबात झाला. राहुल बजाज हे भारतीय स्वातंत्र्यसैनिक आणि समाजसेवक जमनालाल बजाज यांचे नातू आहेत.लहान वयापासूनच व्यावसायिक परिवारात जन्मलेल्या राहुल बजाज यांनीसुद्धा व्यवसाय क्षेत्रात उडी घेतली

दरम्यान, शाळेच्या दिवसांत ते बॉक्सिंग चॅम्पियन होते. त्यानंतर सेंट स्टीफन्स कॉलेजमधून अर्थशास्त्र विषयात बीए मुंबई विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतल्यानंतर ते अमेरिकेत गेले. त्यानंतर त्यांनी तिथल्या हार्वर्ड बिझनेस स्कूलमधून एमबीएची डिग्री पूर्ण केली. 1965 मध्ये ते भारतात परतले आणि कौटुंबिक व्यवसायात सामील झाले. 1968 मध्ये बजाज ऑटोचे सीईओ झाले होते.

थोडक्यात बातम्या- 

“आरोग्यमंत्री गांजा ओढून पत्रकार परिषद घेतात का?”; गोपीचंद पडळकर यांची राजेश टोपेंवर टीका

पुण्यात शववाहिकांचा तुटवडा; प्रादेशिक परिवहन विभागाने ‘या’ वाहनांना दिली शववाहिकेची परवानगी

लसीचे 2 डोस घेतल्यानंतरही मी कोरोना पॉझिटिव्ह पण पूर्णपणे ठणठणीत- मुख्यमंत्री अशोक गहलोत

“संसद भवन महत्त्वाचं की नागरिकांचं लसीकरण?”; पवारांचा रोखठोक सवाल

…अन् कोरोना रुग्णाचं 5 लाखांचं बील आलं अडीच लाखांवर; खासगी रुग्णालयांकडून होणारी लूट उघड

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More