राहुल द्रविडला भारताचा पंतप्रधान करण्याची मागणी

मुंबई | 19 वर्षाखालील भारतीय क्रिकेट संघाला विश्वचषक जिंकून देणारा भारताचा माजी खेळाडू राहुल द्रविडचं नाव पंतप्रधानपदासाठी पुढं करण्यात येतंय. ट्विटरवर यासंदर्भात ट्रेंड सुरु झालाय. 

19 वर्षाखालील क्रिकेट विश्वचषक जिंकल्यानंतर भारतीय क्रिकेट नियामक बोर्डाने खेळाडूंसह सपोर्टिंग स्टाफला बक्षिसांची घोषणा केली. मात्र सर्वांची मेहनत समान असल्याने सर्वांना समान बक्षिस द्यावं, अशी मागणी राहुल द्रविडनं केली. अखेर बीसीसीआयलाही द्रविडची ही मागणी मान्य करावी लागली.

दरम्यान, संगीतकार विशाल ददलानी यांनी यासंदर्भात पहिलं ट्विट केलं. ज्यामध्ये राहुल द्रविडला पंतप्रधान करण्यासंदर्भात आवाहन करण्यात आलं. त्यानंतर #RahulDravidForPM ट्रेंड सुरु झाला. 

या बातमीवर तुमची कमेंट लिहा

तुमच्या पसंतीच्या बातम्या