बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

टीम इंडीयाचा नवीन कोच ठरला, ‘या’ खेळाडूने स्विकारली जबाबदारी

नवी दिल्ली | रवि शास्त्री यांनी टी-20 विश्वचषकानंतर राजीनामा देणार असल्याचं सांगितल्याने टीम इंडीयाच्या प्रशिक्षक पदाची खुर्ची रिकामी होणार आहे. त्यामुळे टीम इंडीयाचा नवा प्रशिक्षक कोण असणार? असा प्रश्न खेळांडूसह अनेकांना पडला होता. मात्र त्या प्रश्नाचं उत्तर आता मिळालं आहे. टीम इंडीयाच्या नवीन प्रशिक्षकाच्या नावाची घोषणा लवकरच करण्यात येणार आहे.

टीम इंडीयाचा नवीन प्रशिक्षक राहूल द्रविड असणार आहे. राहूल द्रविडने प्रशिक्षक पदाची जबाबदारी स्विकारण्यास होकार दिल्याचंं समोर आलं आहे. त्यामुळे बॅट्समननंतर आता लवकरच राहूल द्रविड टीम इंडीयाच्या प्रशिक्षकाची भूमिका निभावताना दिसणार आहे.

मुख्य प्रशिक्षकासोबतच बॅटिंग प्रशिक्षक आणि बॉलिंग कोच देखील बदलण्यात येणार आहेत. बॅटींग प्रशिक्षक म्हणून विक्रम राठोड यांना संधी दिली जाण्याची शक्यता आहे. तर बॉलिंग प्रशिक्षक म्हणून पारस महाम्ब्रे यांच्या नावाची चर्चा आहे.

यापूर्वी राहूलला दोनदा प्रशिक्षकपदाची ऑफर देण्यात आली होती. परंतु त्याने ती नाकारली होती. खेळाडूंना प्रशिक्षण देण्याऐवजी अकादमीमधून नवीन खेळांडूना तयार करण्यात जास्त आनंद वाटतो, असं सांगत त्याने ही ऑफर नाकारली होती. परंतु सौरव गांगुली आणि जय शहा यांच्या सांगण्यावरून त्याने आता ही ऑफर स्विकारली आहे.

 

थोडक्यात बातम्या-

शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणप्रसंगी मिरवणूक काढल्याने माजी मंत्र्यांवर गुन्हा दाखल

‘त्या’ लेडी डॉनचा तुमच्याशी संबंध काय?, नवाब मलिकांनी पुन्हा समीर वानखेडेंना घेरलं

गॅस कटरने एटीएम कापून चोरट्यांनी पळवळी लाखोंची रक्कम

“यंत्रणांचा गैरवापर केला असता तर तुमचं अर्थ मंत्रिमंडळ तुरुंगात असतं”

आता गॅस सिलेंडरच्या बुकिंगमध्ये वाचवा पैसे, कसं ते वाचा सविस्तर

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More