वर्ल्डकप जिंकला टीम इंडियानं, चर्चा फक्त राहुल द्रविडची!

नवी दिल्ली | न्यूझिलंडमध्ये भारताच्या यंग ब्रिगेडनं विश्वचषक उंचावला, मात्र त्यानंतर चर्चा सुरुय ती फक्त आणि फक्त राहुल द्रविड या नावाची…

भारतीय क्रिकेटमध्ये भिंत म्हणून ओळखलं जाणारं हे नाव आज चर्चेत आहे, कारण राहुल द्रविड या संघाचा प्रशिक्षक आहे. राहुल द्रविडच्या हाताखाली या मुलांनी मेहनत केली आणि त्याचं फळ आज चाखालया मिळतंय. 

दरम्यान, राहुल द्रविडचं हे योगदान क्रिकेटप्रेमींपासून लपून राहिलेलं नाही. सोशल मीडियावर लोक त्यामुळेच यंग ब्रिगेडचं अभिनंदन करत आहेतच, मात्र हा आनंदाचा क्षण दाखवल्याबद्दल राहुल द्रविडचेही आभार मानत आहेत. ट्विटरवर त्यामुळे #U19CWCFinal या ट्रेंडनंतर Rahul Dravid दुसऱ्या क्रमांकावर ट्रेंड होतोय.