राहुल फटांगडे हत्येप्रकरणी नगरमधून तिघांना अटक

राहुल फटांगडे हत्येप्रकरणी नगरमधून तिघांना अटक

पुणे | राहुल फटांगडे या तरुणाच्या हत्येप्रकरणी अहमदनगरमधून तिघांना अटक करण्यात आलीय. सर्व आरोपींना 5 दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आलीय.

1 जानेवारी रोजी कोरेगाव भीमा गावात दंगल उसळली होती. कोरेगाव शेजारच्याच सणसवाडीमध्ये राहुल फटांगडेची काही जणांनी हत्या केली होती. त्याने अंगात शिवाजी महाराजांची प्रतिमा असलेला शर्ट घातला होता त्यामुळे त्याला लक्ष्य करण्यात आलं.

दरम्यान, पोलिसांनी याप्रकरणी तिघांना अटक केली असून त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचीही माहिती आहे. तर दुसरीकडे कोरेगाव हिंसाचार प्रकरणी पोलिसांनी आणखी 5 जणांना अटक केलीय. 

Google+ Linkedin