नरेंद्र मोदी, अनिल अंबानींचं नाव राफेलच्या चौकशीतून समोर येणार – राहुल गांधी

नवी दिल्ली |राफेल प्रकरणाची चौकशी संयुक्त संसदीय समितीसमोर झाल्यास पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अनिल अंबानी यांची नावं पुढं येतील, असं काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटलं आहे. ते पत्रकार परिषदेत बोलत होते.

526 कोटींच विमान 1600 कोटींना का विकत घेतलं गेलं?, हिंदुस्थान एरॉनॉटिक्स कडून कंत्राट काढून ते अनिल अंबानीच्या कंपनीला कसे देण्यात आले?, 30 हजार कोटींच ऑफसेट कंत्राट अनिल अंबानींना का दिलं? या प्रश्नांची सरबत्ती राहुल गांधी यांनी मोदी सरकारवर केली आहे.

सर्वोच्च न्यायालयानं राफेल विमानाच्या किमती कॅग अाणि पीएसीकडं असल्याचं म्हटलं होत, यावर राहुल गांधी यांनी पीएसीचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांना याबाबत काही माहित नाही असं म्हटलं आहे. 

दरम्यान, नरेंद्र मोदी पत्रकार परिषद कधी घेणार? असा सवाल राहुल गांधी यांनी विचारला आहे.

महत्वाच्या बातम्या –

-सायना नेहवाल अाणि पी.कश्यप अडकले विवाहबंधनात

-रवी शास्त्रींना क्रिकेटची जाण नाही- गौतम गंभीर

-सोनिंया गांधींच्या विरोधात कुमार विश्वास निवडणुक लढणार?

-“मला बाबा व्हायचंय”; निकने केली प्रियांकाकडे मागणी

-जेव्हा प्रितम मुंडे डाॅक्टर होवून रुग्णांना तपासतात!