बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

राहुल गांधी, प्रियंका गांधी अखेर लखीमपूर पीडित कुटुंबीयांच्या भेटीला, फोटो सोशल मीडियावर व्हायरल

लखनऊ | उत्तर प्रदेशच्या लखीमपूर खिरी येथे झालेल्या हिंसाचाराने राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ उडाली. या घटनेनंतर योगी सरकारने उत्तर प्रदेश राज्यात कलम 144 लागू केलं. हिंसाचारात मृत्यू झालेल्या शेतकऱ्यांच्या कुटुंबीयांच्या भेटीसाठी अनेक नेते लखीमपूूरच्या दिशेने रवाना झाले. पण रस्त्यातच सगळ्यांना रोखण्यात आलं. तर सोमवारी लखीमपूरच्या दिशेने रवाना झालेल्या काँग्रेस सचिव प्रियंका गांधी यांनाही पोलिसांनी अडवलं.

पोलिस आणि प्रियंका गांधी यांच्यात बाचाबाची झाल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतलं. यानंतर मात्र काँग्रेसमध्ये संतापाची लाट उसळली. टीका, आरोप-प्रत्यारोपानंतर काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी अखेर लखीमपूर गाठलं आणि पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. राहुल आणि प्रियंका गांधी यांनी पीडित कुटुंबीयांना भेटत त्यांचं सांत्वन केलं. सांत्वन करतानाचे फोटोज सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

राहुल आणि प्रियंका गांधी यांनी बुधवारी रात्री पीडित कुटुंबीयांची भेट घेतली. लखीमपूर खिरी येथील हिंसाचारात मरण पावलेल्यांचा शहिद असा उल्लेख करत राहुल गांधी यांनी सगळे फोटो ट्वीट केले आहेत. त्यांनी लवप्रीत, पत्रकार रमन कश्यप, सरदार नच्छतर सिंह यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. तुमचं बलिदान कायम लक्षात राहिल. आता न्याय हा झालाच पाहिजे. या क्रुर रात्रीची सकाळ पण नक्की होईल, असं राहुल गांधींनी या ट्वीट सोबत लिहिलं आहे.

राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांचे हे फोटो शेअर करत काँग्रेसच्या अनेक नेत्यांनी भाजप आणि उत्तर प्रदेशातील योगी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

 

 

 

 

 

 

 

 

थोडक्यात बातम्या-

‘या’ ठिकाणी मुसळधार पावसानं घर कोसळून पाच जण ठार

लखीमपूर प्रकरणात मोठी घडामोड,सर्वोच्च न्यायालयाची गंभीर पावलं; सरकारच्या अडचणी वाढणार?

अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा; सरकारकडून मदत जाहीर

#IPL2021 अटीतटीच्या सामन्यात हैदराबादचा बंगळुरूवर ‘रॉयल’ विजय

“11 ऑक्टोबरला महाविकास आघाडीने बंद पुकारलाय, लाज वाटली पाहिजे ठाकरे सरकारला”

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More