राहुल गांधी सॉफ्ट हिंदुत्वाच्या वाटेवर, कर्नाटकातही करणार देवदेव!

नवी दिल्ली | काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी सॉफ्ट हिंदुत्वाच्या वाटेवर असल्याचं दिसतंय. कारण गुजरातनंतर आता कर्नाटकच्या दौऱ्यांमध्येही राहुल गांधी मंदिरांच्या पायऱ्या चढताना दिसणार आहेत. 

काँग्रेसची पिछेहाट सुरु असताना आलेले गुजरातचे निकाल काँग्रेससाठी आशादायी होते. त्यानंतर आता कर्नाटकातील सत्ता राखण्यासाठी राहुल यांच्यासह काँग्रेसला प्रयत्नांची शर्थ करावी लागणार आहे. 

आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राहुल गांधी येत्या 10 ते 13 फेब्रुवारीदरम्यान कर्नाटकचा दौरा करणार आहेत. या दौऱ्यात ते एक मंदीर, दोन लिंगायत धार्मिक केंद्र आणि एका दर्ग्याला भेट देणार आहेत.