राहुल गांधी यांनी काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली

नवी दिल्ली | राहुल गांधी यांनी अखेर काँग्रेसच्या अध्यक्षपदाची सूत्रं स्वीकारली आहेत. देशातील सर्वात जुन्या म्हणजेच 132 वर्षे जुन्या पक्षाचे ते आता नवे अध्यक्ष असतील.

काँग्रेसच्या केंद्रीय निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी त्यांना अध्यक्षपदाची सूत्रे सोपवली. यावेळी मावळत्या अध्यक्ष सोनिया गांधी, माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासह काँग्रेसमधील सर्वच दिग्गज नेते उपस्थित होते. 

दरम्यान, राहुल गांधी यांच्याविरुद्ध एकानेही उमेदवारी अर्ज भरला नव्हता. त्यामुळे त्यांनी 11 डिसेंबर रोजीच बिनविरोध निवड झाली होती. आज त्यांनी अधिकृतरित्या ही जबाबदारी घेतली.