अखेर राहुल गांधी यांची काँग्रेसच्या अध्यक्षपदी वर्णी

नवी दिल्ली | राहुल गांधी यांची अखेर काँग्रेसच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याची घोषणा करण्यात आलीय. निवडणूक समितीचे अध्यक्ष मुल्लापल्ले रामचंद्रन यांनी ही घोषणा केली.

काँग्रेसच्या अध्यक्षपदासाठी राहुल यांना पक्षातून मोठा पाठिंबा होता. त्यांच्याविरोधात एकही अर्ज आला नव्हता त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड होणार हे स्पष्ट होतं. 

दरम्यान, राहुल गांधी 16 डिसेंबरपासून अध्यक्षपदाची धुरा सांभाळणार आहेत. काँग्रेसचे अध्यक्षपद सांभाळणारे ते 18 वे तर गांधी घराण्यातील सहावे व्यक्ती असतील.