बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

मुंबईतील झोपडीधारकांना राहुल गांधींचं मोठं आश्वासन

मुंबई | केंद्रात काँग्रेस पक्षाचं सरकार आल्यास मुंबईतील झोपडीधारकांना व भाडेकरूंना हक्काचे घर देण्याचं आश्वासन काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी दिलं आहे. राहुल गांधीनी ट्विट करत याबाबतची माहिती दिली आहे.

1 मार्च रोजी काँग्रेस नेत्यांनी मुंबईकरांना किमान 500 चौरस फुटांचे पक्के घर देण्याबाबतचा प्रस्ताव मांडला होता. या प्रस्तावाला मी पाठिंबा दिला होता, असं राहुल गांधींनी त्यांच्या ट्विटमध्ये म्हटलं आहे.

राहुल गांधीनी मतदानाच्या एक दिवस आधी अशी घोषणा करून मुंबईकरांना पुन्हा काँग्रेसकडे वळवण्याचा प्रयत्न करत असल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, महाराष्ट्रात चौथ्या टप्यातील निवडणूक 29 एप्रिल रोजी एकूण 17 जागांसाठी मतदान होणार आहे.

महत्वाच्या बातम्या

वाराणसीतून मोदींविरोधात निवडणूक का लढवली नाही? प्रियंका गांधी म्हणतात…

-शहीद करकरेंची मुलगी म्हणतेमा, झ्या वडिलांचाच नाही तर सगळ्या शहीदांचा मान राखला पाहिजे

-पायलट आणि सुरक्षारक्षकाच्या वादात राहुल गांधी म्हणाले, ‘मीच माफी मागतो’!

पाकिस्तानचे समजून भारताने स्वत:च्याच हेलिकाॅप्टरवर क्षेपणास्त्र डागले; निवृत्त कर्नलचा आरोप

-पंतप्रधान पदाच्या शर्यतीत मी नाही- शरद पवार

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More