दुबईमध्ये राहुल गांधींच्या कार्यक्रमाला तुफान प्रतिसाद

दुबई | संयुक्त अरब अमिरातीच्या दौऱ्यावर गेलेले काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी विदेशातही आपला डंका वाजवल्याचं दिसून आलं. एका भव्य सभाग्रहात त्यांचा कार्यक्रम ठेवण्यात आला होता. यावेळी त्यांना ऐकण्यासाठी भारतीयांनी प्रचंड गर्दी केली होती. 

भारतीयांना संबोधित करताना त्यांनी भाजपवर जोरदार हल्ला चढवला. गेल्या साडेचार वर्षात असहिष्णूतेत वाढ झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

बेरोजगारीच्या प्रश्नावरुनही राहुल यांनी भाजपवर हल्ला चढवला आहे. सध्या एकमेकांत फुट पाडण्याचं राजकारण सुरु असल्याचं त्यांनी म्हटलं.

दरम्यान, नरेंद्र मोदी विदेशात गेल्यावर प्रचंड गर्दी जमायची, त्याचप्रमाणे राहुल यांचे भाषण ऐकण्यासाठीही तुफान गर्दी झाली होती. तसेच राहुल यांच्या नावाची घोषणाही मोठ्या प्रमाणात करण्यात आली.

महत्वाच्या बातम्या-

-भुवनेश्वर कुमारनं एकदिवसीय सामन्यात घेतल्या 100 विकेटस

-ऑस्ट्रेलियाचा नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजीचा निर्णय

-भाजप-शिवसेनेमध्ये युतीबाबत सकारात्मक चर्चा

-“राज्याला लुटणा-या युती सरकारला आगामी निवडणुकीत गाडून टाका”

-“शिवसेना आणि भाजप एकाच नाण्याच्या दोन बाजू”