बातमी जशी, आहे तशी...
Thodkyaat News | मराठी बातम्या | Marathi News Live | Marathi Breaking News | News in Marathi | Latest Marathi News | थोडक्यात

“नागपुरात जन्म घेतलेली संघटना…”; राहुल गांधींची संघावर बोचरी टीका

दिसपूर | काँग्रेसचे माजी अध्यक्ष आणि वायनाडचे खासदार राहुल गांधी वेळोवेळी भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघावर टीका करताना दिसतात. सध्या आसामच्या निवडणुकीत काँग्रेसचा धुवाधार प्रचार करणारे राहुल गांधी यांनी अप्रत्यक्षपणे आरएसएसवर टीका केली आहे. तर त्यांनी मोदी सरकारला देखील धारेवर धरलं आहे.

नागपूरात जन्म घेतलेली एक संघटना आख्ख्या देशावर नेियंत्रण प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करत आहे, अशा शब्दात राहुल गांधी यांनी आरएसएसवर टीका केली आहे. तर सीएएच्या मुद्यावरून राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर देखील ताशेरे ओढले आहेत. देशात लोकशाहीचं पतन होतं आहे. तरूण बेरोजगार आहेत. शेतकरी आंदोलन करत आहेत. सीएएवरून देखील आंदोलने होत आहे. आसामची जनता दिल्लीत आल्यावर त्यांनी त्यांची संस्कृती आणि भाषा बदलावी अशी आशा आपण ठेऊ शकत नाही, असंही राहुल गांधी यावेळी म्हणाले.

आसाममध्ये सध्या निवडणुकीचं वारे वाहू लागले आहेत. काँग्रेसने स्टार प्रचारक राहुल गांधी यांना मैदानात उतरवलं आहे. आसाममध्ये 3 टप्प्यात मतदान होणार आहे. येत्या 27 मार्चला पहिल्या टप्प्यातील मतदान पार पडेल यासाठी सर्वच पक्ष आपली संपुर्ण ताकद लावताना दिसत आहे. 2001 पासून 2016 पर्यंत आसाम मध्ये काँग्रेसची सत्ता होती. परंतू 2016 मध्ये त्यांना आसाममधील सत्ता गमवावी लागली.

दरम्यान, या प्रचारात राहुल गांधी यांनी आसामच्या नागरिकांना 5 आश्वासनं दिली आहेत. चहातल्या मजुरांसाठी 365 रुपयांचा दर, राज्यात 5 लाख रोजगार , सीएएला विरोध, 200 युनिट पर्यंत मोफत वीज आणि गृहिणींसाठी 2000 रूपये अशी पंचसुत्री आश्वासनं दिलं गेलं आहे.

थोडक्यात बातम्या-  

इतरांना तुच्छ लेखण्याचा महाजनांचा स्वभावच जळगावात भाजपला घेऊन बुडाला”

‘मेधा कुलकर्णी आपण एका जीवाचा बळी घेतलाय’; रूपाली चाकणकरांचा मेधा कुलकर्णींवर गंभीर आरोप

डोक्यात कोयत्याने वार करत नातवानेच केला आजोबांचा खून; कारण ऐकून सुन्न व्हाल

माजी आमदार मेधा कुलकर्णी यांच्याविरोधात मारहाण केल्याची तक्रार

“नरेंद्र मोदी हे देशाला याेग्य दिशेने नेणारे युगपुरुष”

Comments are closed.

This website uses cookies to improve your experience. We'll assume you're ok with this, but you can opt-out if you wish. Accept Read More