महाराष्ट्र मुंबई

उद्धव ठाकरेंनंतर राहुल गांधींची आदित्य ठाकरेंशी चर्चा; मुंबईतील परिस्थितीविषयी दिला ‘हा’ सल्ला

मुंबई | काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा केल्यानंतर राज्याचे पर्यावरण मंत्री आणि युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना फोन केला. राहुल गांधी आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या कामाबद्दल आणि कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीसंदर्भात चर्चा झाल्याचं कळतंय.

राहुल गांधी यांनी मुंबईतील कोरोनाग्रस्तांच्या वाढत्या संख्येबद्दल चिंता व्यक्त केली. त्याचबरोबर महत्त्वाची सूचनाही केली आहे.

मुंबई महानगरातील लोकसंख्या खूप आहे. मुंबईतील वाढती रुग्णसंख्या चिंतेची बाब आहे. मात्र आपण स्क्रिनिंग आणि टेस्टिंगचं प्रमाण वाढवायला हवं. महाराष्ट्र सरकार सध्या चांगलं काम करत आहे, असं राहुल गांधी आदित्य ठाकरे यांना म्हणाले आहेत.

दरम्यान, राहुल गांधी यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याशी फोन करून संवाद साधला होता. शिवसेना आणि काँग्रेसमधील मैत्री कायम आहे. महाराष्ट्रात निर्माण झालेल्या संकटाच्या काळात काँग्रेस प्रत्येक निर्णयात सरकारसोबत आहे, अशी ग्वाही राहुल गांधी यांनी उद्धव ठाकरे यांना दिली होती.

ट्रेंडिंग बातम्या-

…म्हणून 11 वर्षीय मुलीनं आपल्या आईविरोधातच दाखल केला गुन्हा

खासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन

महत्वाच्या बातम्या-

…तर हर हर महादेव होणारच; नितेश राणेंचा थेट इशारा

काँग्रेसमध्ये खांदेपालटाची चर्चा; नाना रिंगणात तर बाबांच्या हाती छडी!

पक्ष, जात, कारखानदार किंवा मोठ्या घरचा मुलाहिजा न ठेवता कारवाई करा- संभाजीराजे

मेलवर बातम्या मिळवा

खालील रिकाम्या बॉक्समध्ये तुमचा ई-मेल आयडी टाका आणि Subscribe म्हणा. आमच्या बातम्या तुम्हाला ई-मेलवर मिळतील.

ताज्या बातम्या